file image
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव विविध उपक्रमांनी 24 ते 30 एप्रिलपर्यंत साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवार 29 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता भव्य मोटरसायकल रैली महाराष्ट्रीयन ब्राह्मण युवा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली असून या मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हा परिषद रेस्ट हाऊस, सिव्हील लाईन्स येथून प्रारंभ होऊन मुख्य पोस्ट ऑफीस, अशोक वाटीका, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सरकारी बगीचा या मार्गे खोलेश्वर स्थित भगवान परशुराम चौकामधील मुख्य शोभायात्रे मध्ये सदर मोटारसायकल रॅली सम्मीलीत होवून शोभायात्रेसोबत पुढे जाणार आहे. तसेच मंगळवार 29 एप्रिल 2025 रोजी संध्या. 6 वाजता शोभायात्रेचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीष कुलकर्णी यांच्या हस्ते पुजन होवून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे.
शोभायात्रेला भगवान परशुराम चौक खोलेश्वर येथून सुरुवात होवून सिटी कोतवाली, मोठे राम मंदिर, कपडा बाजार चौक, जैन मंदिर, गांधी चौक, तहसिल कार्यालय, वसंत टॉकीज, वर्धमान भवन,मार्गे भगवान परशुराम चौक खोलेश्वर येथे समापन होईल भगवान परशुराम शोभायात्रे मध्ये अरुण शर्मा मित्र मंडळा कडून ब्रह्म वृंदाना अल्पोपाहार तसेच शोभायात्रा मार्गावर माहेश्वरी समाज ट्रस्ट, व स्व शिवपालजी शर्मा परिवार, राम नगर मित्र मंडळ शालिनी टाकीज, नगर सेवक अजय शर्मा कपड़ा बाजार, येथे प्रतिमा पूजन करून स्वागत करण्यात येईल तर गांधी चौक कांच घर या ठिकानी अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळ कडून पूजा व स्वागत करन्यात येईल शोभायात्रेच्या समारोपानंतर लगेच समाज बांधवांकरिता महाप्रसादाची व्यवस्था निमवाडी स्थित मा.ब्रा. संस्कृत विद्यालयामध्ये करण्यात आलेली आहे.
बुधवार 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता भगवान परशुराम जयंतीनिमित्त खोलेश्वर स्थित भगवान परशुराम चौकामध्ये भव्य महाआरतीचे ह.भ.प. श्यामसुंदर शर्मा यांच्या आवाजात आयोजन करण्यात आलेले आहे.
जास्तीत जास्त समाज बांधवांनी जयंती उत्सवाच्या सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन विजय तिवारी वित्त व्यवस्थापन अशोक शर्मा (लोणाग्रा) एड. सत्यनारायण जोशी, भरत मिश्रा, राजेश गोकुलचंद शर्मा अनिल थानवी राजेंद्र एम. तिवारी डॉ. के. ओ. शर्मा रामरतन शर्मा डॉ. आनंद शर्मा ,संतोष बबेरवाल, सिद्धार्थ शर्मा, ॲड. सुशील शर्मा, विष्णुदत्त शुक्ल, निखिलेश दिवेकर, अशोक शर्मा (केळीवेळी), रामप्रकाश मिश्रा, राजेश मिश्रा, डॉ. कमलेश मिश्रा, हरिप्रसादजी शर्मा, डॉ. दिपक केलकर, डॉ. महाशब्दे, डॉ. अभिजीत लऊल, डॉ. पार्थसारथी शुक्ल, डॉ. सुभाष देशपांडे, डॉ. सुरेश सिवाल, डॉ. मिलींद चौधरी, ॲड. शरद मिश्रा, गिरीश गोखले , ॲड. सौरभ शर्मा, निलेश देव, उदय महा, राकेश त्रिवेदी, दिपक उपाध्याय, सागरमल तिवारी, अशोक के. शर्मा, हरिप्रसाद शर्मा, अरुण शर्मा, मनोज गौड, उदय महा, अमोल चिंचाळे, मोहन पांडे, कृष्णा शर्मा, विष्णु दासशुक्ल, हित मेहता, निलेश देव, गिरीश शर्मा, राकेश त्रिक्ला, राजेंद्र तिवारी, राकेश शर्मा, राजेंद्र तिवारी, देवेन्द्र तिवारी, राजेश व्यांगबरे, गोपाल राजवैद्य आदींनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा