Immoral-acts-in-apartments-: बाहेरून कुलूपबंद सदनिकेत युवक-युवतीचे अनैतिक कृत्य; पालकांनी सजग होण्याचे आवाहन




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला शहर हे एज्युकेशन हब म्हणून ओळखल्या जाते. येथे बाहेर राज्य व जिल्ह्यातून मुले मुली शिक्षणासाठी येतात. मात्र पालकांना अंधारात ठेवून अनेक मुले मुली महाविद्यालयीन जीवनात नको त्या गोष्टीत फसतात. असाच काहीसा प्रकार  अकोला शहरात उघडकीस आला आहे.



याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोला शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जठारपेठ भागातील एका नामांकित बिअर बार जवळील एका रहिवासी इमारती मधील सदनिका मध्ये एक युवती एका युवकासोबत असून त्यांचा मित्र बाहेरून कुलूप लावून गेला, असल्याची माहिती नागरिकांनी  समाजसेवक सनी जंजाळ यांना दिली.  सामाजिक कार्यकर्त्याने ही बाब बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद पदाधिकारी सांगितली. यानंतर पदाधिकाऱ्यांनी ही बाब सिव्हिल लाईन्स पोलिसांना दिली. एक पोलीस शिपायासह विहींप बजरंग दलचे हरिओम पांडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपार्टमेंट गाठत एका दुसऱ्या युवकाच्या मदतीने कुलूप उघडले. यावेळी युवक व युवती आतमध्ये आढळून आले. 


युवक हा मूर्तिजापूर येथील रहिवासी असून, नोबेल अली नवाब अली (22 वर्ष) असे नाव असल्याचे समजते. युवतीच्या तक्रारीवरून युवकास पोलीसांनी ताब्यात घेतले तर मुलीला समज देवून पालकांच्या स्वाधीन केले. आरोपीने मुलीला कोचिंग क्लासच्या बहाण्याने आणले होते. त्याच्या साथीदाराने बाहेरून दरवाजा बंद केला आणि तो निघून गेला. दरम्यान आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थिनीच्या अश्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध बीएनएसच्या कलम 75 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


पालकांना आवाहन 



आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी बाहेर पाठविणाऱ्या पालकांनी त्यांच्याकडे लक्ष ठेवावे. कुठे आणि कोणाबरोबर जातात याबाबत मुलांसोबत संवाद साधायला पाहिजे. मुलामुलींनी देखील पालकांच्या कष्टाचे मोल जाणून शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आवाहन ठाणेदार जसवंत सातव यांनी केले आहे.

टिप्पण्या