check-up-camp-lecture-cancer: अकोल्यात वैद्य हंसराज चौधरींचे कर्करोग व अन्य असाध्य आजाराचे मोफत तपासणी शिबिर व व्याख्यान




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जागतिक आरोग्य दिनानिमीत्त अकोला जिल्हा मुद्रक संघ अकोला यांचे विद्यमाने कर्करोग व अन्य विविध आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांकरिता निःशुल्क मार्गदर्शन व  तपासणी शिबीराचे आयोजन 7 एप्रील रोजी सायंकाळी 6 वाजता प्रमिलाताई ओक सभागृहात केले आहे. यामध्ये कॅन्सर, शुगर, थायराईड, मुळव्याध, किडनी विकार, सोरायसीस, पॅरॅलिसीस अश्या विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची नि:शुल्क तपासणी भिलवाडा राजस्थान येथील वैद्य हंसराज चौधरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. चौधरी यांचे 'निरोगी कसे राहता येईल', या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. सर्व नागरिकांसाठी हा उपक्रम मोफत असल्याची माहिती जिल्हा मुद्रक संघ अकोलाचे अध्यक्ष प्रदीप गुरुखुद्दे यांनी दिली.



शासकिय विश्रामगृह येथे आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत या उपक्रमाची संपूर्ण माहिती आयोजकांनी दिली. 




कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते नवग्रह सेवा संस्थान मोतीबोर का खेडा जिल्हा भिलवाडा राजस्थानचे संस्थापक अध्यक्ष वैद्य हंसराज चौधरी यांचे आरोग्य विषयक व्याख्यान होणार आहे. वैद्य चौधरी यांनी आजपर्यंत कर्करोग सह विविध आजारांवर उपचार करुन एक लाख पेक्षा अधिक लोकांना रुग्ण सेवा प्रदान केली आहे. त्यांचे संस्थानला भारतभरातून तसेच विदेशातून दुर्धर आजार असलेले रुग्ण उपचार करण्याकरीता येत असतात, हे विशेष उल्लेखनीय असल्याचे प्रदीप गुरुखुद्दे यांनी सांगितले. 


या सोहळ्यात मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी मंत्री हंसराज अहिर, आमदार नितीन देशमुख, आमदार रणधीर सावरकर, आमदार साजीद खान पठाण, जनता बँकेचे अध्यक्ष  रमाकांत खेतान, माजी आमदार दाळू गुरुजी, आकोटचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र बरेठीया, डॉ. योगेश पाटील, नवग्रह आश्रम भिलवाडाचे डॉ. धर्मेद्रकुमार चौधरी, डॉ.पंकज सैनी, अंनिसचे शरद वानखडे, ॲड. मुकुंद जालनेकर, बाबुलाल गुरुखुद्दे आदी उपस्थित राहणार आहेत.



जिल्हयातील विविध आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांकरिता मार्गदर्शन व रुग्ण तपासणी शिबीराचे आयोजन यापूर्वी करण्यात आले होते. कॅन्सर, किडनी, शुगर, संधीवात या सारख्या अनेक प्रकारच्या दुर्धर आजारांवर आयुर्वेद उपचाराने जवळपास एक लाख रुग्णांना रोगमुक्त करणारे नवग्रह सेवा संस्थानचे संस्थापक अध्यक्ष वैद्य हंसराज चौधरी यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करुन अनेक रुग्णांना व त्यांचे नातेवाईकांना नवसंजीवनी देत असतात. यावेळी दुर्धर आजारी रुग्णांची नि:शुल्क तपासणी करण्याकरिता भिलवाडा राजस्थानचे डॉ. धर्मेद्रकुमार चौधरी, डॉ.पंकज सैनी सेवा देणार आहेत. तपासणी नंतर कॅन्सर रुग्णांची औषधे नवग्रह आश्रम येथून मोफत देण्यात येणार असून शुगर, किडनी सारख्या इतर आजारावरील औषधी देण्यात येणार आहे. या सेवाभावी उपक्रमाचा रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आयोजकांनी करण्यात आले.





पत्रकार परिषदेला मुद्रक संघाचे सचिव राजेंद्र देशमुख, संतोष धरमकर, नंदकिशोर बाहेती, आरिफ खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या