breaking-news-akola-crime: भांडपुरा परिसरात दगडफेकीची घटना; परिस्थिति नियंत्रणात



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या भांडपुरा परिसरात शनिवारी रात्री गाडी ठेवण्याच्या कारणामुळे शेजाऱ्यांमध्ये आपसी वाद होवून परिसरात दगडफेक झाल्याची घटना घडली असल्याचे समजते.



सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुने शहर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भांडपुरा मध्ये दोन गटांमध्ये वाद होवून दगडफेकीची घटना घडली. 

हा वाद गाडी ठेवण्याच्या कारणामुळे दोन शेजाऱ्यांमध्ये झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेवेळी नशेत धुत असलेला एक युवक खुली तलवार हातात घेवून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि आरसीपी पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कळते. 


नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवू नये, असे आवाहन अकोला पोलीस विभागाने केले आहे.

टिप्पण्या