babasaheb-ambedkar-jayanti: अकोल्यातील जुने बसस्थानक प्रांगणात महामानवाची महारांगोळी पूर्णत्वाकडे...

 

ड्रोण फोटो सौजन्य: हंज़ला अमीन अली


ठळक मुद्दा 
जिल्हा कलाध्यापक संघ व काँग्रेस अनुसूचित विभागाचा संयुक्त उपक्रम  



भारतीय अलंकार न्यूज 24

BAnews24 

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त अकोल्यात 18,000 स्क्वेअर फुटाची भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आली आहे.. शहरातील जुने बस स्थानक परिसरात ही रांगोळी वीस हजार किलो रांगोळी आणि 40 स्थानिक रांगोळी कलाकारांच्या संकल्पनेतून साकारली जात आहे.  या भव्य दिव्य रांगोळीला पाहण्यासाठी सर्व नागरिकांनी यावं, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून अकोल्यात ऐतिहासिक अशी 18000 चौरस फूट आकाराची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात येत असून त्या रांगोळीच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.  प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती सेल व अकोला कलाध्यापक संघ यांच्या वतीने ही रांगोळी साकारण्यात येत आहे.


दरवर्षी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध समाजपयोगी उपक्रम राबवित साजरी करण्यात येते. यंदा जागतिक पातळीवर अकोल्याच्या उपक्रमाची नोंद होणार आहे. कारण अकोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त आगळेवेगळे अभिवादन करण्यासाठी तब्बल 18000 चौरस फूट जागेत भव्य दिव्य अशी रांगोळी काढण्यात येत असून त्याची पूर्व नोंद ही गिनिज बुक्स, इंडिया बुक्स यामध्ये सुद्धा करण्यात आली. 



ही भव्य दिव्य रांगोळी काढण्याचे कामाला शनिवार 12  एप्रिल रोजी संध्याकाळपासून प्रारंभ करण्यात आला असून ही रांगोळी आज सोमवारी पूर्णत्वास येत आहे. ही रांगोळी साकारण्यास दोन हजार किलो रांगोळीचा वापर होत आहे. रांगोळी काढण्यासाठी तब्बल 40 जणांची टीम कामाला लागली असून यासाठी अंदाजित 40 तासांचा कालावधी पूर्ण होत आहे. चाळीस जणांच्या टीम मध्ये 30 पुरुष आणि 10 महिला कलाकारांचा समावेश आहे.  


रांगोळी द्वारा  महामानवाला एक आगळीवेगळी अशी मानवंदना ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक अशा अविस्मरणीय क्षणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.



महारांगोळी साकारणार्‍या कलाशिक्षकांची यादी


संजय आगाशे राज्य प्रसिध्दी प्रमुख, अमरावती, सुभाष धार्मिक विभागीय सहकार्यवाह, संदिप शेवलकार जिल्हाध्यक्ष, चंद्रकांत वाघ जिल्हा सचिव, दिनेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष, उमेश जोशी, मंगेश श्रीवास, विवेक फोकमारे, संतोष सहारे, हेमंत उपरिकर, योगेश कड, रविकुमार मुळे, गोपाल देशमुख, आनंदा फुलारी, रानेश टाले, विठ्ठल इडोळे, संजय गोपनारायण, संजय तायडे, रविंद्र काळपांडे,  दिपक भुसारी, रविंद्र पांडे, गणेश ठाकरे, योगेश विखे, रविंद्र दिवटे, महेंद्र कोकणे,  निशांत दलाल, सुनिल देशमुख, प्रतिक वाघ, अभिषेक गावंडे,  अर्चना बोरोकार, अश्विनी महाजन, मेघमाला काठोके, साधना बोबडे, रुपाली कुळकर्णी, सुलभा परनाळे, प्रिती घनबहादूर, अनिता पवार.



पत्रकार परिषदेचा व्हिडिओ

व्हिडिओ: पत्रकार परिषद महामानव महारांगोळी पाहण्यासाठी येथे क्लिक करा



टिप्पण्या