- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-crime-gold-chain-stolen: ट्युशन क्लासचा पत्ता विचारुन सोनसाखळी केली लंपास; अकोला शहरात घडल्या सलग दोन घटना, संशयित आरोपीचे छायाचित्र जारी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Gold chain stolen after asking for tuition class address; Two consecutive incidents took place in Akola city, Photo of suspected accused released
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: ट्युशन क्लासचा पत्ता विचारून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चलाखीने पळवून नेण्याचा दोन घटना अकोला शहरात घडल्या. या संशयित आरोपीचे छायाचित्र पोलिसांनी जारी केले आहे.
काल सोमवार 08 एप्रिल 2025 व आज मंगळवार 09 एप्रिल 2025 रोजी सकाळी 07 ते 08 वाजेचा सुमारास पोलिस स्टेशन खदान हद्दीतील गोरक्षण रोड परिसरातील रचना नगर व मलकापूर परिसरात सलग दोन दिवस महिलांची गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरीचा घटना घडल्या आहे.
या चोरीतील संशयित हे 20 ते 25 वयोगटातील युवक असून, दोन्ही घटनेत ट्युशन क्लासचा पत्ता विचारून गळ्यातील चेन हिसकावून मोटर सायकल वरून पळ काढला आहे.
या घटनेतील संशयित आरोपी हे परिसरातील एका सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाले आहेत. यावरुन पोलिसांनी संशयित आरोपींचे फोटो तयार करून ओळख पटविण्यासाठी हे फोटो जारी केले आहे.
फोटो मधील संशयीत बाबत माहिती दिल्यास अकोला पोलिसांकडून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा