- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील वसंत देसाई स्टेडियम येथील मास्टर पावर स्विमिंग क्लब यांनी प्रशिक्षित केलेले दिव्यांग जलतरणपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नागपूर येथे दिव्यांग राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 21, 22, 23 मार्च 2025 कालावधीत आयोजित केली आहे. यामध्ये अर्जुन बोरोवाल, गौरव कळसकर, कुणाल टेलगोट, सोहम तिवाले, ओम् तिवाले, सोहम भुसारे, यश अडबोल, शिवम महाले, अर्णव पवार, ज्ञानेश्वरी इंगळे, वैष्णवी देशमुख, नम्रता भारसाकले, प्रतिक्षा खंडारे, पल्लवी पारिसे, शुभांगी मुंडे, प्राची मोरे हे खेळाडू सहभागी झाले आहेत.
जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी खेळाडूंचे कौतुक करून स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या.
क्लबचे संचालक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षक दीपक सदानशिव ,सुशील कांबळे, प्रमोद खंडारे, मोहील खरात, ज्योती पंपालिया, दिनेश वाघ, संदीप मेहरे, अभिषेक ताले, संतोष जगताप, चंचल महाजन, मनीषा वंजारी, प्राची शिरसाट, विक्की पवार यांनी खेळाडूंना निःशुल्क प्रशिक्षण दिले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा