- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
sharad-gadakh-pdkv-rahuri-: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त पदभार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Dr. Sharad Gadakh, Vice Chancellor of Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, has been given the additional charge of the post of Vice Chancellor of Mahatma Phule Agricultural University, Rahuri.
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे मान्यतेने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. डॉ. शरद गडाख यांची अकोला कृषि विद्यापीठाचे कुलगुरु होण्यापूर्वी ते महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये संशोधन व विस्तार शिक्षण संचालकपदी कार्यरत होते हे उल्लेखनीय.
डॉ. शरद गडाख यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला चे कुलगुरू म्हणून 19 सप्टेंबर, 2022 पासून सूत्र हाती घेत आपल्या कृतिशील कार्यकुशलतेने संपूर्ण विद्यापीठ प्रक्षेत्राचा सार्वभोम शाश्वत विकास दृष्टीपथात आणत विद्यापीठाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु अधोरेखित केली.
डॉ. गडाख यांनी नावीन्यपूर्ण आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्वपूर्ण उपक्रमांची मालिका यामध्ये विद्यापीठाची पडीक जमीन लागवडीखाली आणणे, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाचे विक्री केंद्र सुरु करणे, फळबागेखाली लागवड क्षेत्र वाढविणे, विविध फळांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, सेंद्रिय शेती प्रकल्प, शेतकरी शास्त्रज्ञ मंच, तर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षा मंच, उद्योजकता विकास मंच, हायटेक ऍग्री मंच यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले. यामुळे विद्यापीठाच्या महसुली उत्पादनात वाढ होवून शेतकर्यांना त्यांच्या जिल्ह्यातच विद्यापीठाचे उत्पादने उपलब्ध झाली. तसेच मॉडेल व्हिलेज संकल्पनेमुळे कृषि विस्तारामध्ये नविन मापदंडे स्थापीत झाली. संशोधन केंद्रांचे बळकटीकरण, मॉडेल व्हिलेज, शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन करुन कृषि विस्ताराला नविन दिशा दिली.
राहुरी येथील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात दैदिप्यमान कार्य केलेले आहे. त्यांनी विविध पिकांचे 19 वाण विकसित केलेले आहेत. यामध्ये वांग्याचा एक, कारल्याचे पाच, काकडीचे दोन, वालचे एक, ज्वारीचे नऊ आणि नागलीचा एक वाण विकसित केलेले आहे. त्यांचे आत्तापर्यंत 68 संशोधन लेख, 36 तांत्रिक लेख, 128 विस्तार लेख आणि विविध प्रकाशने प्रसिध्द झालेली आहेत. त्यांच्या शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्तारातील अभुतपूर्व योगदानामुळे त्यांना जागतिक स्थरावरील एक पुरस्कार, राष्ट्रीय पातळीवरील तीन पुरस्कार आणि राज्य पातळीवरील सहा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. डॉ. शरद गडाख यांच्या प्रदीर्घ अनुभवाची नोंद घेत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी डॉ. गडाख यांना राहुरी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.
या निवडीमुळे राज्याच्या सर्व स्तरातून डॉ. शरद गडाख यांचे अभिनंदन होत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा