municipal-corporation-budget: मनपाची अर्थसंकल्‍पीय सभा संपन्‍न: 2025-26 चे अंदाजपत्रकात कोणतीही कर वाढ नाही; अकोलेकरांच्या सेवेत लवकरच 42 वातानुकुलीत ई-बस




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला महानगरपालिकेच्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह येथे मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्‍या आदेशान्‍वये आज 25 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता सन 2024-25 चे सुधारित व सन 2025-26 चे मुळ अंदाजपत्रकाबाबत अर्थसंकल्‍पीय सभेचे आयोजन करण्‍यात होते.


            

सभेमध्‍ये अंदाजपत्रकीय तरतुदीस अनुसरून मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. मनपा आयुक्‍त यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करतांना महानगरपालिका प्रशासनाचे प्राप्‍त होणारे उत्‍पन्‍न तसेच मनपा लोकाभिमुख सेवा देण्‍याकरिता तसेच आवश्‍यक सोई-सुविधा पुरविण्‍याकरिता अपेक्षित कामानिहाय खर्च याचा समातोल राखीत 10.92 लक्ष शिल्‍लकीचे अंदाजपत्रक सादर केले. 



सभेचे संचालन अनिल बिडवे यांनी तर अंदाजपत्रकीय सभेचे प्रास्‍ताविक मुख्‍य लेख अधिकारी जगदीष मानमोठे यांनी केले.


            

यावेळी मुख्‍य लेखा अधिकारी, जगदीष मानमोठे, मुख्‍य लेखा परिक्षक वैजनाथ शेळके, मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे, शहर अभियंता नीला वंजारी, कार्यकारी अभियंता अजय गुजर, महानगर पालिका सचिव अमोल डोईफोडे, सहा.आयुक्‍त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, शिक्षणाधिकारी डॉ.शाहीन सुल्‍ताना यांचेसह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.



अकोला महानगरपालिका प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.


अकोला या ऐतिहासीक वारसा लाभलेल्या शहराच्या महानगरपालिकेत मी 7 मार्च 2024 रोजी प्रशासक तथा आयुक्त म्हणून रूजू झालेला असून माझ्या कार्यकाळातील प्रशासक या नात्याने पहिले अंदाजपत्रक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम १०३ व १०४ नुसार सन २०२४-२५ चे सुधारीत व कलम ९५, ९६, व १०० अन्वये सन २०२५-२०२६ चा आर्थिक वर्षासाठीचा मुळ अंदाजपत्रक मी अकोलेकरांच्या सेवेत सादर करीत असल्याचे डॉ.लहाने म्हणाले.


सन २०२५-२६ चे अंदाजपत्रकात कोणतीही कर वाढ केलेली नाही. सन २०२४-२५ या वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक व सन २०२५-२६ या वर्षाचे अकोला महानगरपालिकेचे मुळ अंदाजपत्रक तयार करत असतांना या महानगरपालिकेस प्राप्त होणारे कर, शुल्क, अनुदाने, अन्य जमा लक्षात घेऊन अकोला महानगरपालिकेच्या क्षेत्रात करावयाची विकास कामे व सर्व नागरिकांना पुरविण्याच्या अत्यावश्यक सेवांसाठी होणाऱ्या खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवून योग्य ताळमेळ ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


अकोला शहरातील व अकोला शहराच्या हद्दवाढ भागातील दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन, विद्युतीकरण, रस्ते विकास दैनंदिन पाणी पुरवठा देखभाल दुरूस्ती, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक सुविधा इ. सर्व नागरी तथा आवश्यक सुविधांची पुर्तता करतांना समतोल विकासाचा विचार करण्यात आला आहे. शहरातील सर्व समाज स्तरांमधील नवतरूण, महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना व समाजातील सर्व घटकांना दर्जात्मक आवश्यक मुलभूत सोयी सुविधा देण्यासाठी ही महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे.


सन २०२४-२५ च्या मंजुर अंदाजपत्रकानुसार माहे नोव्हेंबर २०२४ पर्यंतच्या खर्चाचा आढावा या अंदाजपत्रकात घेण्यात आलेला आहे तसेच उर्वरित चार महिन्यांच्या कालावधीत प्राप्त होणारी अंदाजित जमा रक्कम व त्याअनुषंगाने विकास कामांवरील होणारा खर्च गृहित धरून २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. तसेच अत्यंत महत्वाचे म्हणजे सन २०२५-२६ या वर्षाचे अंदाजपत्रक तयार करतांना यापूर्वी हाती घेतलेल्या कामांचे दायीत्व व जमा होणारा महसुल याचा विचार करून जमा खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.


महानगरपालिकेच्या महसुलाच्या उत्पन्नामध्ये प्रामुख्याने राज्य शासनाकडून स्थानिक संस्था कराच्या भरपाईपोटी मिळणारे जी.एस.टी अनुदान, मालमत्ता कर, पाणी पट्टी, मुद्रांक शुल्क ईत्यादीचा समावेश आहे. सन २०२४-२०२५ या वर्षात मालमत्ता करा वरील शास्ती मध्ये सवलत देऊन जास्तीत जास्त मालमता कर वसुली करण्याचा प्रयत्न आहे. अकोला महानगरपालिकेच्या स्वनिधीचे उत्पन्न असलेल्या मालमत्ता करातील कमी प्राप्तीमुळे स्वनिधीची स्थिती अत्यंत कमकुवत झाल्याचे आढळते.


महानगरपालिकेत अनेक विकास कामे ही मनपा स्वनिधीमधून करणे अत्यावश्यक असतात. परंतु कमकुवत स्वनिधीच्या सर्व बाबींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्रतिकुल परिणाम या महानगरपालिकेच्या स्वउत्पन्नामधून करण्यात येणाऱ्या विकास कामांवर झाला आहे. शहराला आवश्यक दैनंदिन सुविधा पुरविण्यासाठी वर्तमान वस्तुस्थिती स्विकारून प्राप्त महसुल उत्पन्नातून आवश्यक विकास कामे पूर्ण करून शहरातील नागरिकांना आवश्यक दैनंदिन सोयी सुविधा देण्यासाठी ही महानगरपालिका सदैव प्रयत्नशील आहे. मालमत्ता कराचा भरणा सुरळीत होण्यासाठी या महानगरपालिकेचे चारही झोन कार्यालयात तसेच मनपा मुख्यालयात कर भरणा केंद्र सुरू ठेवली आहेत. नागरिकांना डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन पोर्टलद्वारे मालमत्ता कराचा भरणा करता येतो सदर सुविधा अविरत सुरु आहे.


दिव्यांग जनांचे जगणे सुकर व्हावे यासाठी महानगरपालिका प्रयत्नशिल आहे. अकोला महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवाना दरमहा उदरनिर्वाह भत्ता आरटीजीएस द्वारे सरळपणे बँक खात्यात जमा केला जातो.



४२ वातानुकुलीत ई-बस 


महानगरपालिका परिवहन सेवेबाबात नागरीकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पीएम ई-बस सेवा योजने अंतर्गत केंद्र शासनाकडून एकूण ४२ वातानुकुलीत ई-बस प्राप्त होणार आहेत. खडकी दक्षिण झोन मधे ई-बस डेपोचे स्थापत्य विषयक काम प्रगतीपथावर आहे. या कामाकरीता रू १० कोटी एवढी तरतुद करण्यात आली आहे तसेच चाजींग स्टेशन करीता रू २.५० कोटीची तरतुद करण्यात आली आहे. पीएम ई-बस सेवा मनुष्यबळ पुरविणे रू ४ कोटी तरतुद करण्यात आली असून बस सेवा परिचालनामधील तुट भरून काढण्याकरीता रू ७ कोटीची तरतुद करण्यात आली आहे.



वाढीव पाणी पुरवठा योजना 


केंद्र शासन पुरस्कृत अमृत-२.० योजनेअंतर्गत अकोला शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेकरीता लागणाऱ्या रू ७२१ कोटी पैकी रू २२३ कोटी रूपयांच्या कामास तत्वतः मान्यता प्राप्त झाली आहे. सन २०२५-२६ करीता रू १०० कोटीची तरतुद केली असून मनपा स्वहिस्सा म्हणून रू ३० कोटी ची तरतुद केली आहे. 



मलनिस्सारण योजना


मलनिस्सारण योजनेच्या संपूर्ण शहराच्या कामाकरीता लागणाऱ्या एकूण प्रकल्प किंमत रू १६७४ कोटी पैकी रू ६२९.०२ कोटी टप्पा-१ यास प्रशासकीय मान्यता प्राप्त होवून कामास सुरवात झाली आहे. या योजनेकरीता सन २०२५-२६ करीता रू २०० कोटीची तरतुद केली असून मनपा स्वहिस्सा म्हणून रू ६० कोटीची तरतुद केली आहे.



इतर तरतुदी 


*महानगरपालिकेच्या प्रशासकीय ईमारत बांधकामा करीता रू १५० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. 

 

*दिव्यांग व्यक्तींना सोई सुविधा पुरविण्याकरीता दिव्यांग भवन बांधणे या करीता रू १५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. 


*शहरातील कचरा उचलण्याकरीता नाविण्यपूर्ण योजने अंतर्गत ई वाहने खरेदी करण्याकरीता रू ७ कोटी एवढी तरतुद करण्यात आली आहे. 


*कचरा सकंलन करणे या करीता अभिकर्ता नेमणेसाठी रू १० कोटी तरतुद करण्यात आली आहे.


*महानगरपालिके द्वारा संचालीत उद्याने व हरीत क्षेत्रे यांचे देखभाली करीता तसेच पर्यावरण पुरक वातावरण निर्मितीकरीता नविन हरित क्षेत्रे, उद्यान विकसीत करण्याकरीता रू ५० लक्ष तरतुद करण्यात आली आहे. 


*वृक्षारोपण व संगोपन याकरीता रू २ कोटी तरतुद करण्यात आली आहे. राष्ट्रीय शुध्द हवा या लेखा शिर्षाखाली रू ५ कोटीची तरतुद करण्यात आली आहे.


*अकोला शहराच्या मंजुर विकास योजनेमधील विविध आरक्षणे विकसित करणे तसेच विविध विकास कामांकरीता भूसंपादन करणे आवश्यक असते. सदर भूसंपादनाकरीता रू ५० कोटीची तरतुद करण्यात आली आहे.



*ई गर्व्हनन्स अंतर्गत ई-ऑफीस प्रणालीची कार्यवाही अंतीम टप्प्यात आली असून येत्या काही दिवसात मनपाचे कामकाज ई-ऑफीस प्रणालीद्वारे करण्यात येईल. 


*IWBP प्रणाली अंतर्गत विवाह नोंदणी, बाजार परवाना (ट्रेड), पाणी पुरवठा देयक इत्यादीची अंमलबजावणी करण्यांत आली असून त्याद्वारे नागरीकांना सेवा देण्याचे काम सुरू आहे.


वरील प्रमाणे सन २०२५-२६ या वर्षाच्या अंदाजपत्रकात वर्तमान स्थितीनुसार अपेक्षित प्राप्त होणाऱ्या विविध करापोटी महसुल व शासना कडून विविध योजनांसाठी मिळणारा निधी यांची सांगड घालून अकोला महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांसाठी आवश्यक सोई सुविधा निरंतर पुरविणे तसेच सर्वांगीण विकासाच्या योजना राबविणे या साठी महानगरपालिका सदैव प्रयत्नशिल राहील, असे डॉ.लहाने यांनी सांगितले.






सन २०२५-२६ चे अंदाजपत्रकीय अपेक्षित जमा रकमेचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे.


अ.क. उत्पन्नाचे शिर्ष


अंदाजपत्रकीय उत्पन्न (आकडे कोटीत)


सुरवातीची शिल्लक


७६.३२



मालमत्ता कर


९८.७०



विशेष पाणीपट्टी


१७.००



खुल्या भुखंडावरील कर


१.५०



१०


मनपा मालमत्ता उपयोगीता सेवेपासून उत्पन्न


अनुदान व अंशदाने


२०.३८


अ) स्थानिक संस्था कर अनुदान (जीएसटी)


ब) शिक्षण व इतर अनुदाने (शिक्षण फंड)


११०.००


२४.००


क) मुद्रांक शुल्क व इतर अनुदान


१०.१९


११


अधिमुल्य रक्कम


२२.००


१२


विकास शुल्क उत्पन्न


१२.००


१३


मालमत्ता कर शास्ती


५.००


१४


गुंठेवारी विकास शुल्क


२.००


१५


संकीर्ण


१२.४९


एकूण महसुली (भाग-१)


३३५.२६


१६


शासनाकडून मिळणारे भांडवली अनुदान व मनपा मालकीच्या जागेचे उत्पन्न (भाग-२)


८६३.३०


१७


असाधारण ऋण व निलंबन लेखे (भाग-३)


१८१.९५


एकुण भाग १+२+३ व सुरवातीची शिल्लक धरून अपेक्षित उत्पन्न


१४५६.८३


वरीलप्रमाणे महानगरपालिकेचे भाग १,२,३ व सुरवातीची शिल्लक धरून उत्पन्न एकूण रु.१४५६.८३ कोटी अपेक्षित आहे.



टिप्पण्या