- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणारे जेतवन नगर येथे रविवारी सायंकाळी भर रस्त्यावर एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली. हल्लेखोर घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले होते. दरम्यान जखमी युवकास उपचारार्थ दवाखान्यात नेले असता वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत घोषित केले होते. करण दशरथ शितोळे असे मृतक युवकाचे नाव आहे. ही घटना पूर्व वैमनस्यातून दोन गटात झालेल्या वादातून घडली असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. तर एका आरोपीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी खदान पोलिसांनी प्रशिक राजेश जावळे (वय 22) व मयुर श्रावण मस्के (वय 23) (दोघेही रा. जेतवन नगर अकोला ) या संशयीतांना ताब्यात घेतले होते. तर आज सोमवारी 28 वर्षीय निखिल सुभाष कांबळे, 20 वर्षीय संगम सोनकांबळे याच्यासह 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर एका अज्ञात आरोपीचा शोध जारी आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनकर धुरंधर, नितीन मगर, रवी काटकर, नीलेश खंडारे, मनोज दुबे, अमित दुबे, काळुराम पवार, अमर पवार यांनी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास खदान पोलिस करीत आहे.
प्राप्त माहितीनूसार, रविवारी मृतक करण शितोळे हा सुटी असल्याने घरीच होता. मात्र सायंकाळच्या सुमारास आठवडाभराचे मजुरीचे पैसे आणण्याकरिता घरातून बाहेर जात असल्याचे त्याच्या आईस त्याने सांगितले. यानंतर तो मजुरीचे पैसे आणण्यास बाहेर पडला. मात्र थोड्या वेळाने त्याच्या आईला त्याने फोन करून सांगितले की, मला काही युवक मारहाण करीत आहे. तू मला वाचवायला ये. यानंतर त्याची आई तशीच घटनास्थळाकडे धावत निघाली. मात्र घटनास्थळापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर परिसरातील नागरिकांनी करण यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारार्थ भरती केले. मात्र तेथे वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत घोषित केले. यावेळी रूग्णालय परिसरात मृतकाच्या कुटुंबीयांनी, नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी आक्रोश केला. या घटनेत मृतक करण दशरथ शितोळे (वय 22 वर्ष) याचे मित्र वैभव पुरुषोत्तम शितोळे (वय 19) व विशाल गणेश वरोटे (वय 29) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना खदान पोलिसांनी उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान हे प्रकरण ऑटोरिक्षाचा धक्का लागला असल्यावरून घडले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेचा संपूर्ण क्रम परिसरातील एका सीसीटीव्ही मधे कैद झाला आहे. पीडित करण यास तीन ते चार युवक मारहाण करीत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे. घटनेनंतर हा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाला. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
video news: आणखी एका हत्येने शहर हादरले" जेतवन नगरमध्ये तीन युवकांवर ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणाने चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती. यामध्ये एका युवकाचा उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे, करण शितोळे असं युवकाच नाव असून त्याच्या सोबत असलेले त्याचे दोन साथीदार सुद्धा या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये हल्लेखोर हे करण (मृतक) आणि त्याच्या साथीदारांवर हल्ला करतांना दिसत आहे. खदान पोलिसांनी या प्रकरणात एकूण 8 हल्लेखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. या 8 आरोपींपैकी चार अल्पवयीन आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक केली असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. फरार आरोपी हा अल्पवयीन आहे."
मनोज केदारे,
पोलीस निरीक्षक,
खदान पोलीस स्टेशन
हे देखील वाचा:
खदान परिसरात युवकाची हत्या;
भारतीय अलंकार न्यूज 24
Akola city
Akola police
Crime news
Karan Shitole
khadan police station
murder case
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा