- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
international-womens-day-spl: जागतिक महिला दिन 2025: भारतीय नाण्यांवर आतापर्यंत 10 थोर महिलांची छायाचित्रे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
राणी व्हिक्टोरिया यांच्या फोटोचे
जगातील पहिले व शेवटचे
सोन्याचे नाणे 1841 साली
जगातील पहिले सोन्याचे नाणे.
" अक्ष करन्सीज " चे संचालक अक्षय खाडे यांनी दिली माहिती
अक्षय खाडे
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1985 ते 2024 पर्यंत एकूण 10 थोर महिलांची छायाचित्रे भारतीय नाण्यांवर छापण्यात आली आहेत. राणी व्हिक्टोरिया यांचे छायाचित्र असलेले जगातील पहिले आणि शेवटचे सोन्याचे नाणे 1841 सालात काढण्यात आले होते. या नाण्याचे वजन 10..66 ग्रॅम एवढे होते. यानंतर जगातील कोणत्याही देशाने सोन्याचे नाणे काढले नाही. अशी माहिती जागतिक व ऐतिहासिक मुद्रा आणि करन्सी संग्राहक तथा "अक्ष करन्सीज" चे संचालक अक्षय प्रदीप खाडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिली.
याबाबत अधिक माहिती देताना अक्षय खाडे म्हणाले की, पहिला महिला दिन 8 मार्च 1943 रोजी मुंबईत साजरा करण्यात आला. तर 1975 हे वर्ष युनोने " जागतिक महिला वर्ष " म्हणून घोषित केले.
चलनांवरील महिलांच्या छायाचित्राबाबत माहिती देताना अक्षय यांनी सांगितले की, 1975 साली भारत सरकारने दहा पैशांच्या चलनी नाण्यावर महिलेचे काल्पनिक चित्र काढून ते प्रसारित केले. त्यावर समानता, विकास, शांती हे स्लोगन छापण्यात आले होते. त्यानंतर 1980 साली 10 व 25 पैशांच्या नाण्यांवर महिलेचे काल्पनिक चित्र काढून त्यावर" ग्रामीण महिलाओ की प्रगती " असे स्लोगन छापले होते.
दहा थोर महिलांची छायाचित्रे असलेली दहा भारतीय नाणी.
त्यानंतर माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची 1984 साली हत्या झाल्यानंतर 1985 साली 50 पैसे व पाच रुपयांचे नाणे काढून त्यावर इंदिरा गांधी यांचे छायाचित्र छापले होते. त्यानंतर एकदम 24 वर्षानंतर 2009 साली 5 रुपये व 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर सेंट अल्फोंसा यांचे छायाचित्र छापण्यात आले. कॅथोलिक चर्च द्वारा संत उपाधी दिलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. यानंतर 2010 साली 5 रुपये व 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर मदर टेरेसा यांचे छायाचित्र, 2014 साली 5 रुपये व 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर प्रख्यात गायिका व अभिनेत्री बेगम अख्तर यांचे छायाचित्र, 2015 साली स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांच्या विरोधात लढलेल्या राणी गायी दिन्यालु यांचे छायाचित्र 5 रुपये व 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर छापण्यात आले होते.
2016 साली 5 रुपये व शंभर रुपयांच्या विशेष नाण्यावर प्रख्यात गायिका एम. एस. सुब्बू लक्ष्मी यांचे छायाचित्र, 2020 साली 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर श्रीमती विजया राजे सिंधिया यांचे छायाचित्र, 2023 साली 525 रुपयांच्या विशेष नाण्यावर संत मीराबाई यांचे छायाचित्र, 2023 सालीच 500 रुपयांच्या विशेष नाण्यावर राणी दुर्गावती यांचे छायाचित्र व मागील वर्षी 2024 साली 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर सहज योगाच्या पुरस्कर्त्या निर्मलादेवी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.
जगातील निवडक देशांच्या नोटावरील महिला यांची छायाचित्र
संपूर्ण जगात 200 पेक्षाही जास्त देश आहेत. त्यातील इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्युझीलँड यांच्या चलनी नोटांवर राणी एलिझाबेथ तसेच कॅनडातील नोटांवर व्हिओला डिस्मंड यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. इतरही काही 10 ते 15 टक्के देशांच्या नोटा व नाण्यांवर त्या त्या देशातील थोर महिलांची छायाचित्रे छापण्यात आलेली आहेत. अशी ही माहिती अक्षय खाडे यांनी दिली आहे.
10 Great women
भारतीय नाणे संग्राहक
Indian Coins
indira gandhi
International Womens Day
womens day 2025
Womens Portraits
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा