- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
crime news: खोट्या गुन्ह्यात अडकवून विद्यार्थ्यावर दबाव; संबंधितांवर कारवाई करावी, मृतकाच्या नातेवाईकांची मागणी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे जगड
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला : उच्च शिक्षणाची आणि शिकवणी वर्गाची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी हे अनेक स्वप्न घेऊन शहरात येतात. असेच काही स्वप्न घेऊन आलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा संपविली. मात्र या घटने मागे नागरिकांचं रक्षण करणारे पोलीसच असल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला.
शहरातील आकाशवाणी केंद्राच्या मागे असलेल्या जलाराम सोसायटीमध्ये राहणाऱ्या व इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना घडलीय. प्रसन्न वानखडे अस मृत विद्यार्थीच नाव असून, तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवाशी आहेय. प्रसन्न हा नीटच्या परीक्षेची तयारी करत होता. दीड महिन्यापूर्वी कार्तिक नामक विद्यार्थ्याचा प्रसन्न सोबत वाद झाला होता आणि यातूनच प्रसन्नला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आलं, असा आरोप प्रसन्नचे मामा समाधान साबळे यांनी केला आहे.
प्रसन्नवर कारवाई न करण्याकरिता सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे कार्यरत एक पोलीस तपास अधिकारी सतत पैशाची मागणी करत होता. मात्र, पैसे न दिल्याने प्रसन्नला ठाण्यात बोलवून मानसिक त्रास द्यायचा, असा गंभीर आरोप प्रसन्नचे मामा समाधान साबळे यांनी केला आहे.
पोलिसांच्या जाचामुळे प्रसन्नने आत्महत्या केली असून, संबंधित पोलिसांवर आणि खोटी तक्रार देणाऱ्या विद्यार्थ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रसन्नच्या नातेवाईकांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला असून, प्रसन्नच्या आत्महत्येस कोणी जबाबदार आढळल्यास त्यांच्यावर निश्चितच कारवाई कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीसांनी नातेवाईकांना दिले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा