blood-donation-camp-pdkv-akl: कृषि पदवीधरांनी रक्तदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी; तब्बल 503 युनिट रक्तसंचय करीत रुग्णसेवेचा जपला वसा!



ठळक मुद्दे

राष्ट्रीय सेवा योजना डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोलाचा महत्वपूर्ण उपक्रम!


कृषि विद्यापिठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जपली सामाजिक बांधिलकी. 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: कृषी शिक्षणात अग्रेसर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कार्यक्षेत्र संपूर्ण विदर्भ असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या तरुणाईला सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्यात येते. विद्यार्थी कल्याण विभागाचे अंतर्गत विदर्भातील सर्वच कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यान्वयन होत असून गावपातळीवरील निवासी शिबिराचे माध्यमातून या माध्यमातून कृषी पदवीधरांची ग्रामीण भागाशी ना अधिक घट्ट करण्यासह इतर सामाजिक बांधिलकीचे कृतियुक्त धडे गिरविले जातात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या 37 महाविद्यालयांमध्ये नियमित कार्यक्रमासाठी 2800 तर विशेष शिबिरासाठी 1400 विद्यार्थी विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांनी 7 दिवसांचे विशेष शिबिर आयोजन करणे अनिवार्य असून या शिबिरादरम्यान रक्तदान शिबिरेही आयोजित करण्यात आली. 




रक्तदानाचे फायदे:


1 प्राणवाचक दान 

2 आरोग्यासाठी उपयुक्त 

3 हृदयाचे आरोग्य

4 मानसिक समाधान 



डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेली प्रमुख रक्तदान शिबिरे आणि संकलन 


 १)  समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा – ग्राम खळ्याल गव्हाण येथे आयोजित शिबिरात २२ युनिट रक्तदान झाले. 


२) कृषी महाविद्यालय,   अकोला – ग्राम सिसा मासा येथे विशेष शिबिरात २२ बॉटल रक्तदान झाले. 


३) कृषी महाविद्यालय, रिसोड – ग्राम सवड येथे रक्तदान शिबिरात ३० बॉटल रक्तदान झाले. 


४)  कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा – ग्राम शिदोडी येथे आयोजित शिबिरात ५५ रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. 


५) कृषी महाविद्यालय, पिंपरी (वर्धा) – ग्राम बिवापूर येथे १३ बॉटल रक्तदान झाले. 


६. श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती – ग्राम ब्राह्मणवाडा भगत येथे ९ बॉटल रक्तदान झाले. 


७. कृषी महाविद्यालय, चामोर्शी (तालुका) – ग्राम बिवापूर येथे  २० बॉटल रक्तदान झाले.


८. कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अकोला – ग्राम परांडा येथे ३५ बॉटल रक्तदान झाले. 


९.  पी. आर. पोटे कृषी महाविद्यालय, अमरावती – ग्राम रेवासा येथे १७  बॉटल रक्तदान झाले. 


१०. कृषी महाविद्यालय, दारव्हा – ग्राम भुलाई येथे ३८ बॉटल रक्तदान झाले.

 

११. कृषी महाविद्यालय, हिराटोला- ग्राम गोरेगाव येथे १५ बॉटल  रक्तदान झाले. 


१२.  श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती - ग्राम दारापूर येथे ३६ बॉटल रक्तदान झाले.  


१३. कृषी महाविद्यालय, उमरखेड- ग्राम बारा येथे २५ बॉटल रक्तदान झाले. 


१४. वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ- ग्राम भोयर येथे २० बॉटल रक्तदान झाले. 


१५. कृषी महाविद्यालय सडक अर्जुनी – ग्राम कनेरी येथे २३ बॉटल  रक्तदान झाले. 


१६. मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ – ग्राम लासीना  येथे ३५ बॉटल रक्तदान झाले. 


१७. अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ – ग्राम बारी येथे ३२ बॉटल रक्तदान झाले. 


१८. कृषी महाविद्यालय, मुल – ग्राम गडीसुरला येथे ३६ बॉटल रक्तदान  झाले. 


या उपक्रमामध्ये १८ महाविद्यालयातील स्वयंसेवक व गावकरी यांनी ५०३  रक्तदान झाले. 



कुलगुरूंचा अभिप्राय


रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचतात. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, प्रसूतीतील माता, तसेच कर्करोग आणि थॅलेसेमिया रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत रक्तदात्यांच्या मदतीमुळे त्यांचा जीव वाचतो.

रक्तदान हे केवळ एक सामाजिक कर्तव्य नसून ते मानवी जीवन वाचविण्याचे पवित्र कार्य आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी संस्कृतीने पाचशेहून अधिक युनिट रक्त संकलन करून समाजाला चांगला संदेश दिला आहे. प्रत्येकाने दर तीन महिन्यांनी रक्तदान करून समाजातील गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा. 

डॉ. शरद गडाख, कुलगुरू


राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष शिबिरांसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात संचालक शिक्षण डॉ. श्यामसुंदर माने यांचे नेतृत्वात प्रत्येक महाविद्यालयाचे प्राचार्य,  कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा विद्यापीठ समन्वयक डॉ. संदीप हाडोळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील डॉ. मंजुषा देशमुख, प्रा.रोहित तांबे, विलास इरतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल दाभाडकर, रुपाली खोसे, शुभम राऊत, संजय बोबडे,   कृषि विद्यापिठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

टिप्पण्या