- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Internal-strife-in-bjp-akola-dist: ऐन निवडणुकीच्या काळात भाजपातील आंतरिक कलह चव्हाट्यावर; नाराज कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केला गौप्यस्फोट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आपला राग भारतीय जनता पक्षावर नाही. परंतु अकोल्यातील नवे नेतृत्व हिणकस पद्धतीने काम करतात. जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. सातत्याने भाजपच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे आपण फक्त निवडणुकीच्या प्रचारातून बाहेर पडत असून विधानसभा निवडणूक असल्याने आपण भाजपच्या विरोधात काम करणार नाही, असं वक्तव्य आज हॉटेल जसनागरा येथे आमंत्रित पत्रकार परिषदेत भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते प्रतुल हातवळणे आणि माजी महापौर अश्विनी हातवळणे तसेच माजी नगरसेवक ॲड. गिरीश गोखले यांनी जाहीर केले.
भाजपच्या काही नेत्यांकडून पक्षाच्या निष्ठावंतांचा सातत्याने अपमान होत आहे. संघाच्या शिस्तीत वाढलो असल्याने आणि पक्ष शिस्त संस्कारामुळे आतापर्यंत एक शब्दही बोललो नाही. सर्व अपमान सहन केले. मात्र काल घडलेली घटना, जी की सार्वजनिक ठिकाणी सांगण्या सारखी नाही. त्यामुळे मी आणि माझी पत्नी आणि माझे सहकारी आम्ही पक्षातच राहणार आहे. मात्र या विधानसभा निवडणूक प्रचार पासून स्वतःला दूर ठेवत असून संचलन समिती पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रतूल हातवळणे यांनी सांगितले.
पत्रकारांनी हे नवे नेतृत्व कोण आहेत, असे विचारता प्रतुल हातवळणे यांनी रणधीर सावरकर नाव उच्चारून पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला. आमची पक्षाप्रती असलेली निष्ठा आमची कमजोरी समजत असल्याने त्याची चीड आली आहे. रणधीर सावरकर यांच्यावर वयक्तिक रोष नाही. मात्र त्याचे वागणे बोलणे स्वभावप्रवृत्तीवर नाराज असल्याचं प्रतुल हातवळणे यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्ष हा पूर्वी एका परिवार वाटायचा आता हा परिवार राहिला नाही. गोवर्धन शर्मा, भाऊसाहेब फुंडकर, संजय धोत्रे हे नेते सर्वांना सोबत घेवून चालायचे. अलीकडे अकोल्यातील भाजपा नेते मंडळी गलिच्छ राजकारण करीत आहेत. प्रत्येक वेळी डावलण्याचा प्रयत्न करतात. बैठकीला देखील बोलवत नाहीत. अकोल्यात 20 ते 25 निष्ठावान या नेतृत्वापासून नाराज आहेत. निवडणुक नंतर याविरुद्ध पक्षश्रेष्ठकडे तक्रार करणार असल्याचे अश्विनी हातवळणे यांनी सांगितले. तसेच आमची ही लढाई आत्मसन्मानासाठी असल्याचेही त्या म्हणाल्या.
सन 2012 मधे विजय अगरवाल यांना पक्षातून काढून टाकले होते. 2013 मध्ये त्यांची पक्षात वापसी झाली होती. 2017 मधे आपली तिकिट कापली गेली होती. तर नगरसेवक असताना विकास कामांसाठी निधी खेचून आणला होता. आता शिंदे सरकार वेळी देखील कोटीचा निधी अकोला शहरासाठी मंजुर झाला. मात्र विकास कामांमध्ये अडथळे आणल्या गेले, असे वक्तव्य यावेळी ॲड. गोखले यांनी केले.
संपर्क झाला नाही
पत्रकार परिषदेनंतर यासंदर्भात भूमिका काय आहे, हे विचरण्या करिता आमदार रणधीर सावरकर यांच्याशी संपर्क साधला असता, वृत्त लीहेस्तीतोवर संपर्क होवू शकला नाही.
उद्या नरेंद्र मोदी अकोल्यात
भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या शनिवारी सकाळी पंतप्रधान तथा भाजपचे नेते नरेंद्र मोदी अकोल्यात येणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशीच नाराज कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपाचे दोन्हीं उमेदवाराबाबत गौप्यस्फोट केल्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
Ashwini hatwalane
BJP
election season
Girish Gokhale
Internal strife
pratul hatwalne
press conference
revelations
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा