- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
anticipatory-bail-rejected-akl: “तो आवाज माझा नव्हेच” म्हणणारा लाचखोर फरार आरोपी विजय चव्हाण याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: खदान पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल विजय चव्हाण सन 2019 मधे एका प्रकरणात
एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. या प्रकरणात आपला सहभाग असल्याचे नाकारणारा आरोपी विजय चव्हाण याचा आवाज पडताळणी अहवाल मागील महिन्यात प्राप्त झाला असून, यात तो दोषी आढळला. यामुळे अटक कारवाईच्या भीतीपोटी आरोपी चव्हाण हा फरार आहे. मात्र त्याने अकोला न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज शुक्रवार 28 मार्च रोजी न्यायालयाने नामंजूर केला आहे. यानंतर आता आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हा ACB समोर शरणागती स्वीकारणार का, हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन येथे मागील काही वर्षांपासून कार्यरत असलेला पोलिस कॉन्स्टेबल विजय चव्हाण उरळ पोलिस स्टेशन येथे सन 2019 मधे कार्यरत होता. त्यावेळी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडून 20 हजार रुपये हप्ता मागितल्याने एसीबीच्या कारवाईत तो अडकला होता. मात्र या प्रकरणात आपला काही सहभाग नाही असे तो म्हणत होता. मात्र फोन मधील आवाज हा आरोपी चव्हाण याचाच असल्याचे पडताळणी नंतर स्पष्ट झाल्याने आरोपी हा फरार आहे.
सन 2019 मध्ये अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस स्टेशनला आरोपी चव्हाण हा कार्यरत असताना, त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाळू वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला दरमहा 20 हजार रुपयांची लाच मागणी विजय चव्हाण याने केली होती. त्याबाबत अकोला एसीबीकडे 4 डिसेंबर 2019 ला तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर 8 डिसेंबर 2019 रोजी त्याची पडताळणी करण्यात आली होती. परंतु चव्हाण याला एसीबीच्या सापळ्याची भनक लागल्याने त्याने ही रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी त्याच्यावर लाच मागणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असता त्याने फोन रेकॉर्डिंग मधील आवाज माझा नाहीच, असे सांगितल्याने ही रेकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅब मध्ये आवाजाच्या पडताळणीसाठी पाठविण्यात आली होती.
गेल्याच महिन्यात लॅब मधून आवाजा बाबत अहवाल अकोला एसीबीला प्राप्त झाला असून हा आवाज लाच मागणी करणारा विजय चव्हाण याचाच असल्याचे सिद्ध झाले आहे. या अहवालाच्या आधारे अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उरळ पोलिस स्टेशनला 2019 साली लाचेची मागणी केल्याबद्दल, विजय चव्हाण याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार अप. क्र. 91/2025 कलम 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र विजय चव्हाणला आधीच याची भनक लागली असल्याने तो अकोल्यातून फरार झाला आहे.
दरम्यान आरोपी विजय चव्हाण याने अटक होण्याची भीतीपोटी अकोला न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र शुक्रवार 28 मार्च रोजी DJ1 A. D. Kshirsagar यांच्या न्यायलयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. Anticipatory bail rejected. न्यायालयात सरकार पक्षाची बाजू APP. Rajesh Akotkar यांनी मांडली.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील तक्रारदार यांनी 4 डिसेंबर 2019 रोजी अवैधरित्या रेती वाहतुकीचा व्यवसाय चालु ठेवण्याकरीता संजय नामदेवराव कुंभार, व विजय सुखदेवराव चव्हाण (दोन्ही तत्कालिन नेमणुक पो.स्टे उरळ ता. बाळापूर जि. अकोला) हे दरमहा 20 हजार रुपये हप्त्याप्रमाणे लाच मागणी करीत असल्याबाबतची तक्रार अँटी करप्शन ब्युरो कार्यालय अकोला येथे दिली होती.
ईश्वर चव्हाण, तत्कालिन पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. अकोला यांनी 8 डिसेंबर 2019 रोजी 10.20 वा ते 11.20 वा. चे सुमारास केलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान कारंजा रमजानपूर गावाचे जवळ पो.ना. विजय चव्हाण, तत्कालिन नेमणुक पोस्टे उरळ यांची भेट झाली. त्यावेळी पो.ना. विजय चव्हाण यांनी तक्रारदारास अवैधरित्या रेती वाहतुकीचा व्यवसाय चालु ठेवण्याकरीता रू. २०,००० च्या लाच रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. १२ डिसेंबर २०१९ रोजी आजमाविण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान पो.ना. विजय चव्हाण यांना संशय आल्याने लाच रक्कम स्विकारली नाही. उपसंचालक, प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, अमरावती यांचेकडुन प्राप्त स्पेक्ट्रोग्राफीक तपासणी अहवालानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी लोकसेवक विजय सुखदेवराव चव्हाण, तत्कालिन नेमणूक पोस्टे उरळ यांचेविरूध्द पोलीस स्टेशन उरळ, जि. अकोला येथे अप.क. ९१/२०२५ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई मारूती जगताप, पोलीस अधीक्षक अ. क. ब्युरो अमरावती, सच्छिंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक अ.क. ब्युरो अमरावती व मिलींदकुमार बहाकर पोलीस उपअधीक्षक अ. क. ब्युरो अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी केली.
ACB Akola
Akola city
Akola court
Anticipatory bail
Court news
Crime news
khadan police station
rejected
Ural police station
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा