accident-truck-hits-parked-truck: लग्नाच्या वरातीच्या ट्रकची उभ्या ट्रकला धडक; नवरीसह 20 जखमी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील व्याळा जवळ लग्नाच्या वरातीच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. वरात घेऊन जाणाऱ्या ट्रकने एका उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याचे समजते. ही घटना आज रविवारी सकाळी घडली.



प्राप्त प्राथमिक माहितीनूसार, ही वरात यवतमाळ जिल्ह्यातील डोकी येथून चाळीसगाव येथे जात होती. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची समोर येत आहे. या दुर्घटनेत नवरीसह तिच्या कुटुंबातील 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले असून, काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.



अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहेत.




जखमींची नावे

 

Kalpana chandkurampure 

Dhoki gao kelapur 

dist yavatmal


Anjana Arjun More 

age 45 f

Rajni tq jhari dist yavatmal


Kalpana namdev more 

age 28 year f

Dubati gao tq zhari dist yavatmal.


nita arjun more 

age 19yr f

Rajni gao tq jhari dist yavatmal


Kalpana vinod wadale

Age 45 yrs F

Dhoki kelaur yawatmal


Sumit sanjay madavi

Age 13 yr male

Dhoki kelapur yavatmal 


Saraswati chankuram

Yavatmal

टिप्पण्या