abduction-case-LCB-akola-city: महिला नेत्याची नात अपहरण प्रकरण: शिवणी बायपास जवळ मिळाली सुखरूप

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन 



ठळक मुद्दा 

घरी परत गेल्यास पालक रागावतील या भीतीने शाळेतून गेली होती निघून…


 


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील शाळेतुन एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले बाबत  4 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता.  या गुन्ह्याचे तपासात जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले होते. 5 फेब्रुवारीचे सकाळी 00.30 (4 फेब्रुवारी रात्री 12.30 वाजता) दरम्यान LCB चे पथकला शिवणी बायपास जवळ ही मुलगी सुखरूप मिळून आली आहे. मुलगी घरून रागाने शाळेत आली होती. आता परत घरी गेली तर पालक रागावतील, यामुळे मुलगी शाळेतुन निघून गेली होती. पो स्टे सिव्हिल लाइन्स येथे मुलीला आई वडिलांचे ताब्यात देण्यात आले.




दरम्यान, काल 4 फेब्रुवारीला अकोल्यात धक्कादायक प्रकार समोर आला होता . अकोल्यातल्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झाले अशी वार्ता पसरली होती. अकोल्यातल्या कृषी नगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या 12 वर्षीय मुलीच अपहरण झाल असल्याचे समजताच पालक वर्ग चिंतित झाले होते. मुलीच्या अपहरण प्रकरणात  अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस ठाण्यात अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे वंचित पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पोलीस ठाण्यात पोहचुन ठाण मांडून बसले. पोलिसांनी तातडीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. अपहरणाच्या या प्रकारामुळं अकोला शहरात आणि कृषी नगर परिसरात एकच खळबळ उडाली होती.


दरम्यान, मुलीच्या शोधार्थ सिव्हिल लाईन पोलिसांचे दोन पथक गठीत करण्यात आले. मुलीच्या शोधात पथक तातडीने रवाना झालेत. तर दुसरीकडे पाच ते सहा संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरु होती.  या प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ठाणेदार जयवंत सातव यांच्याशी फोनवर चर्चा करून तातडीने मुलीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. 


दरम्यान, मुलीच्या कुटुंबियांनी काही संशयितांची त्यांची नावे पोलिसांना दिली. राजकिय, कौटुंबिक अश्या सर्व बाजूने पोलिसांनी तपास सुरू केला होता. अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथके घटनास्थळी दाखल होऊन शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथली पाहणी पोलिसांनी केली असल्याची माहिती पोलीस अधिकारी जयवंत सातव यांनी दिली.


दरम्यान, अकोला शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलींची छेडछाड तसंच अपहरणाचे प्रकार वाढले आहे. पालक आणि मुलींमध्ये भितीचं वातावरण निर्माण होत आहे, मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांचा अकोला पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक आणि वंचितकडून होत आहे.


या प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व सिविल लाईनचे पोलीस कर्मचारी त्यांच्याशी तात्काळ  संपर्क केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेने व पोलीस कर्मचारी यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली होती.



दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन मध्ये हजर होऊन ठीया आंदोलन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव, जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, प्रभा शिरसाठ, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे व युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, गजानन गवई, मंदा शिरसाट, महानगर अध्यक्ष वंदना वासनिक, मनोहर बनसोडे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.


टिप्पण्या