- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
shiva-gaura-wedding-festival: महाशिवरात्री पर्वावर अकोला शहरात प्रथमच शिव-गौरा विवाह महोत्सव उत्साहात साजरा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
For the first time in Akola city, the Shiva-Gaura wedding festival was celebrated with enthusiasm on the occasion of Mahashivratri. (All images & news script: BAnews24 Bhartiya Alankar News 24)
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाशिवरात्री पर्वावर अकोला शहरात प्रथमच शिव-गौरा विवाह महोत्सव साजरा करण्यात आला. श्री राज राजेश्वर मंदीर येथून श्रीशंकराची महावरात काढण्यात आली. ही वरात श्रीअंबिका माता मंदिरात पोहचून, येथे शिव गौरा विवाह सोहळा बुधवारी रात्री संपन्न झाला. भारतीय अलंकार न्यूज 24. BAnews24.
जिल्ह्यात प्रथमच पार पडलेल्या अशा आगळ्यावेगळ्या शिवविवाहात खरोखर असलेल्या लग्नप्रमाणे सर्व विधी पार पडल्या. गणेश स्थापना, महेंदी, हळद अश्या सर्व विवाह विधी उत्साहात करण्यात आल्या. भारतीय अलंकार
ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात आदल्या दिवशी मंगळवारी महेंदी आणि हळदी कार्यक्रम झाला. भारतीय अलंकार. तर आज गुरुवारी महाप्रसादाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.
बुधवारी सायंकाळी महाशिवरात्री पर्वावर श्री राजराजेश्वर मंदिरापासून भगवान महादेवाची महावरात काढण्यात आली. यामध्ये विविध पेहराव केलेले देवगण, ऋषि गण, शिवगण, भूत पिशाच या महावरातीत सामील झाले होते. ही अद्भुत वरात प्रथमच अकोल्यात निघाली होती. भारतीय अलंकार.
भगवान महादेव विशालकाय नंदिवर विराजमान होते. हा कृत्रिम नंदी सजीव नंदी प्रमाणेच दिसत होता. ही महावरात महानगरातील रस्त्यावर भ्रमण करीत अंबिका माता मंदिर (बागेतली देवी, रिझर्व्ह माता मंदिर, मरिमाय मंदिर) येथे पोहोचून शिवविवाह सोहळा संपन्न झाला. भारतीय अलंकार.
आपल्या परंपरा संस्कृतीचे दर्शन नवीन पिढीला घडावे, या उद्देशाने अकोला शहरात प्रथमच हा भव्य शिव गौरा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यात महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. भारतीय अलंकार.
भारतीय अलंकार न्यूज 24
महाशिवरात्री 2025
Akola city
BAnews24
mahashivratri 2025
Raj Rajeshwar Temple
shiv goura vivah
shiv vivah
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा