भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील गंगाधर प्लॉट मधील आरती अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली आज सकाळी साडे आठ नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे.
आग भीषण असली तरी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
या आगीमध्ये लाखोंचं साहित्य जाळून खाक झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.
इमारतीत राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अरुंद गल्ली असल्याने अग्निशमन दलाच्या गाडीला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र जवानांनी आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने अवघड कार्य सोपे झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सह पोलीस पथक घटनास्थळी पोहचलेले आहे.
बचावकार्य
जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह घटनास्थळी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा