भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. तुकाराम बिरकड हे विविध क्षेत्रांचे जाणकार व विकासासाठी कार्यशील नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली असल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्व. बिडकर यांच्या अकोला येथील रामनगर परिसरातील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली व सांत्वन केले. खासदार सुनील तटकरे, आमदार किरण सरनाईक, आमदार विक्रम काळे, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री अजित पवार यांनी तुकाराम बिडकर यांचा मुलगा पवन बिडकर, पत्नी राधा बिडकर, भाऊ शत्रुघ्न बिडकर व परिवारातील अन्य सदस्यांशी संवाद साधून सांत्वन केले.
स्व. बिडकर यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात मोठे कार्य आहे. ते अष्टपैलू व्यक्तिमत्व, लोकांच्या सुखदुःखाशी समरस होणारे सच्चे लोकनेते होते. ते सामाजिक प्रश्नांची जाण असलेले व विकासासाठी कार्यशील नेतृत्व होते, अशी भावना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬇️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा