crime-bribe-police-constable: तीन हजार रूपयेची लाच घेताना पोलीस शिपाई अडकला ACB च्या जाळ्यात



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अँटी करप्शन ब्युरो, अमरावती पथकाने आज मोठी कारवाई करीत पातूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई पवन सुनील भाकरे  (वय 36 वर्षे, पद पोलीस शिपाई  (वर्ग-3), पो.स्टे. पातुर जि. अकोला. रा. वसंत नगर मानोरा ता. मानोरा जि. वाशिम) यास तीन हजार रूपयेची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 



थोडक्यात हकिगत अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांच्या विरूध्द पातुर पोलीस ठाण्यात यापुर्वी देशी दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. तक्रारदार यांनी सध्या दारू विकीचा धंदा बंद केला असुन, सध्या मोलमजुरी करीत आहे. मात्र आरोपीने तक्रारदार यांना मागील गुन्हयाच्या अभिलेखावरून तडीपारीची कारवाई न करण्याकरीता पाच हजार रूपये लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी 20 फेब्रुवारीला  ला.प्र.वि. अकोला येथे तक्रार दिली होती.


या तक्रारीवरुन 20 फेब्रुवारी रोजी कारवाई दरम्यान आरोपी भाकरे याने पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी पाच हजार रूपये मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून स्विकारण्याची समंती दर्शविली.


तर 21 फेब्रुवारी 2025 रोजी पंचासमक्ष आयोजीत सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक पवन सुनिल भाकरे याने तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम तीन हजार रुपये पंचासमक्ष स्विकारली. यावरुन आज रोजी  आरोपी लोकसेवक यांना लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आलेले असुन पो.स्टे. पातुर, अकोला येथे गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरु आहे.


सदरची कार्यवाही मारुती जगताप, पोलीस अधीक्षक, अन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती,  सचिंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, मिलिंदकुमार बहाकर, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि., अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पो.नि. भारत जाधव यांच्यासह दिगांबर जाधव, उपेंद्र थोरात, संदिप ताले, किशोर पवार, चंद्रकांत जनबंधु यांनी पार पाडली.






टिप्पण्या