bee-attack-akola-barshi-takali: मधमाश्यांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी; उपचारादरम्यान मृत्यू



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथील शेतात एका कार्यक्रम दरम्यान मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने तीस वर्षीय विवाहित महिलेचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. रेशमा पवार असे मृत महिलेचे नाव आहे. BAnews24



पवार कुटुंब आज त्यांच्या काजलेश्वर मधील शेतात पुजे करिता गेले होते.  काजळेश्वर शेत शिवारात हरभरा काढण्याआधी पूजेच्या दरम्यान अगरबत्तीचा धूर उडाल्याने शेजारी असलेल्या झाडावर बसलेले आग्या मोहाचे पोळ उठल्याने मधमाशांनी हल्ला केला. BAnews24

या हल्ल्यात रेशमा पवार  गंभीर जखमी झाल्याने त्यांना अकोला येथे रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुली आहे. 


चिमुकल्या मुली आईच्या मायेस पोरक्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. BAnews24 रेशमा पवार यांच्यासह या हल्ल्यात दोन लहान मुली,एक पुरुष व एक महिला असे सहा जण जखमी झाल्याची माहिती त्यांचे नातेवाईक अरुण पवार ( अकोला) यांनी दिली.

टिप्पण्या