Bangladeshi-infiltration-case: बांगलादेशी नागरिक घुसखोरी प्रकरण: किरीट सोमय्या यांनी नोंदविले बयाण, प्रशासकिय अधिकारी कर्मचारी आता रडारावर!





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला जिल्हयात 

बांग्लादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या संदर्भात आज किरीट सोमय्या यांनी स्वतः अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीरवर बयाण नोंदवलं आहे.

किरीट सोमय्या यांनी तक्रारी सोबत 80 जणांचे गैर मार्गाने जन्म दाखला मिळवून भारताचा नागरिकत्व मिळाल्याचे पुरावे दिले आहेत.

तक्रारीनुसार कारवाई करण्याचे अकोला पोलिसांनी मान्य केल्याचं सोमय्या यांनी सांगितलं आहे. याआधी 12 जणांची तक्रार करण्यात आली होती, त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. तर आज पुन्हा 80 लोकांची यादी सोमय्या यांनी पोलिसांना दिली आहे. 


तहसीदारांनी बेकायदेशीररीत्या जन्माचे दाखले दिले आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी लवकरच फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्याचा अधिकार पोलिसांना देणार येणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.



याप्रकरणात सामील असलेल्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शाळेतील नोंदी तपासण्याचे काम सुरू झाल्याचंही ते म्हणाले. बनावट दाखले तहसीदार यांच्या शिवाय होऊ शकत नाही म्हणून कव्हर ऑफ ऑपरेशन करायला जाणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्यावरही कारवाई होणार अस सोमय्या यांनी स्पष्ट केलं. जिल्हाधिकारी यांनी काम केलं नाही तर सोमय्या त्यांना सोडणार नाही, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. तर काही तहसीलदार निश्चित जेलमध्ये जाणार असा थेट इशाराही सोमय्या यांनी दिला.




टिप्पण्या