akola-lcb-online-betting-crime: नामांकित हॉटेल मालकाच्या शेतात चाले ऑनलाईन जुगार खेळ ; आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश




ठळक मुद्दे 

*Online स‌ट्ट्यासाठी ID तयार करून बेटींग करणारी आतंरराज्यीय गँग पोलिसांच्या ताब्यात 


*अकोल्यातील नामांकित हॉटेल मालकाचा समावेश 


*जागा मालकासह 33 आरोपी अटकेत 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: क्रिकेट व इतर खेळावर चालणारा Online स‌ट्ट्यासाठी ID तयार करून बेटींग करणारी आतंरराज्यीय गँग स्थानिक गुन्हे शाखा अकोलाने ताब्यात घेतली असून, एकुण 28 लाख 36 हजार 265 रूपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. जागा मालकासह एकुण 33 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


काल 18 फेब्रुवारी 2025 रोजी शंकर शेळके, पोलीस निरीक्षक LCB यांना गोपनीय माहीती मिळाली की,  पो.स्टे. बार्शिटाकळी हद्दीतील ग्राम येवता ते कातखेड रोडवर कातखेड शिवारात रविंद्र विष्णुपंत पांडे याचे शेत आहे. त्या शेतात गहु पेरलेला असुन, विटा सिमेंटने पक्के बांधकाम केलेली तीन मजली इमारत आहे. या ईमारतीचा पहिल्या व दुस-या मजला येथे काही इसम मोबाईल, लॅपटॉप द्वारे मोठया प्रमाणात अवैधरित्या विनापरवाना पैश्याचे हारजितचा ऑनलाईन खेळ खेळवित आहे.


अशा माहितीवरून पोलीस अधीक्षक  बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाने अधिकारी व पोलीस पथकासह घटनास्थळी जावुन रेड कारवाई केली. याठिकाणी एकुण 33 आरोपी मिळुन आले. यातील आरोपी यांनी Fairplay (URL link https://admin.fairplay24.in/login, 100 Panal Depos0241 (URL link 100panel.com/login), अशा प्रकारचा Webapp चा वापर करून क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कसिनोगेम, पेड ऑनलाईन गेम, ईत्यादी गेमचा व्हॅट्सअप, टेलीग्राम ईत्यादी सोशल मिडीया ग्रुपवर जाहिरात करून ग्राहकाकडुन ऑनलाईन फोन पे द्वारे पैसे घेवुन त्यांची आयडी बनवुन त्यांना पैश्याप्रमाणे Web ID वर ॲड करून सट्टा खेळवुन जिंकलेल्या किंवा हरलेल्या पैश्यांची देवाण घेवाण करतात असे दिसुन आले.


एकुण  33 आरोपी मध्ये गुजरात राज्यातील 06, उत्तर प्रदेश राज्यातील 03, बिहार व मध्य प्रदेश राज्यातील प्रत्येकी 1 महाराष्टातील चंद्रपूर, पूणे, मुंबई, अमरावती बुलढाणा येथील 08 व अकोला जिल्ह्यातील 14 आरोपी आहेत.


त्यांचेकडून एकुण 12 Laptop, 113 मोबाईल, 10 बँकेचे Passbook, 02 पासपोर्ट, 13 ATM कार्ड, Internet Router Airtel, jio चे 12 राउटर व मोडेम, जुगार खेळण्यासाठी वापरलेली सर्व साहीत्य जप्त करण्यात आले असुन वरील सर्व आरोपी विरुद्ध पो.स्टे. बार्शीटाकळी येथे 60/2025 कलम कलम 318 (4), 112 (2), 3(5) भारतीय न्याय सहींता सहकलम 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास  पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने स्थानीक गुन्हे शाखा करीत आहे.


एकंदरीत कारवाई दरम्यान मिळालेल्या प्राथमीक माहिती वरून असे दिसुन आले की येवता रोडवरील फार्म हा मालक रविंद्र विष्णुपत पांडे (वय 63 वर्ष रा. कातखेड ता. बार्शिटाकळी जि. अकोला व्यवसाय संचालक वैभव हॉटेल) यांनी अवैध जुगार चालविण्यासाठी संजय गुप्ता व मोनीश गुप्ता यांना अवैध रितीने जागा उपलब्ध करून दिली होती. मोनिश निरंजन गुप्ता व संजय गुप्ता यांनी फरार आरोपी महेश डिककर (रा. लोहारी ता. अकोट) याचे माध्यमातुन अटक आरोपीची टोळी जमवून आरोपींना Mobile, Laptop, Wifi ची सुविधा तसेच बोगस बँक अकाउंट उपलब्ध करून दिले.


असा चालायचा खेळ


सट्टा चालविणारे Telegram, whatsapp Group वरून सट्टा खेळण्यासाठी Web ID उपलब्ध असल्याची जाहीरात करत होते. याद्वारे ग्राहक त्या नंबर वर संपर्क करून Betting Web ID घेवुन सट्टा खेळत होते.


बँक खाते फ्रीज 

कार्यवाही दरम्यान विवीध बँकांचे 54 बँक खाते निष्पन्न झाले आहे. ज्याचे मालकी विषयी खात्री करणे सुरु असून संबधीत बँकेला पत्रव्यवहार करून खाते फ्रिज करण्याची प्रकिया सुरू आहे.



केलेल्या कारवाई एकुण मोबाईल 113 किंमत 13,85,000 रूपये Laptop 12 किंमत 3, 30, 000- इतर साहित्य 1, 29000 रू आणि विवीध बँक खात्यातील 9, 92, 262 रू रक्कम फ्रिज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्ह्यात अशाप्रकारे एकुण 28,36,262 रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचे मुख्य सुत्रधार कोण आहे का ? याचा तपासा दरम्यान शोध घेण्यात येत आहे. फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक  बच्चन सिंह यांनी माहिती मिळताच भेट दिली आहे.


यांनी केली कारवाई

ही कार्यवाही  पोलीस अधिक्षक  बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे,  पो. नि. शंकर शेळके, स्था.गु.शा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली व स्था.गु.शा. अकोलाचे स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद पठाण, ग्रेड. पो.उप.नि. दशरथ बोरकर स. फौ. राजपालसिंह ठाकुर, स. फौ. गणेश पांडे, पो.हवा. फिरोज खान, भारकर थोत्रे, सुलतान पठाण, प्रमोद ढोरे, रविंद्र खंडारे, खुशाल नेमाडे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसिमोद्दीन, उमेश पराये, पो. अंमलदार लिलाधर खंडारे, स्वप्निल खेडकर, आकाश मानकर, उदय शुक्ला, स्वप्निल चौधरी, अभिषेक पाठक, राहुल गायकवाड, अशोक सोनवणे, भिमराव दिपके, मोहम्मद आमीर, सुमित राठोड, गंगाधर धुंपडवाड, चालक अंमलदार ग्रेड पो.उप.नि. विनोद ठाकरे, पो.अंम. प्रविण कश्यप अक्षय बोबडे, महिला पो.हवा. तुळसा दुबे महिला पो.अंम. ज्योत्स्ना लाहोळे यांनी केली आहे.


आरोपींची नावे 


प्रसनजीत नाजुकराव वानखडे वय २५ वर्षे रा. चिंचखेड लाहोरी ता. अकोट जि. अकोला 


अशोक सम्राट सपकाळ वय ३७ वर्षे रा. चिंचखेड लाहोरी ता. अकोट जि. अकोला 


अजय कैलास गवई वय २८ वर्षे रा. चिंचखेड लोहारी ता. अकोट जि. अकोला 


स्वप्नील मिलींद शिरसाट वय ३८ वर्षे रा. मिल्ट्री स्कुल जवळ, मोरगाव भाकरे, अकोला 


विश्वजीत कैलास गवई वय २० वर्षे रा. रा. चिंचखेड लाहोरी ता. अकोट जि. अकोला 


दिपु बुध्दीराम पासवान वय २० वर्षे रा. कौडीया, गायत्रीनगर, खोराबार, गोरखपुर उ.प्र


निखील सुभाष वानखडे वय २२ वर्षे रा.इंदीरा नगर, शिवाजीनगर तेल्हारा ता. तेल्हारा जि. अकोला 


शुभम राजवंश पटेल यय २३ वर्षे रा. वार्ड नं १३, खुरैना पताही ईस्ट चंपारण, बिहार


राज अनिरुध्द पासवान वय १८ वर्षे रा. गायत्रीनगर, खोराबार, कुराघाट गोरखपुर उ प्र 


विकास बुध्द प्रकाश सपकाळ वय ३६ वर्षे रा. चिंचखेड लाहोरी ता. अकोट जि. अकोला 


रतनकुमार ब्रिजनारायण त्रिपाठी वय २४ वर्षे रा.३५८, एल. कोडईया, सिहासनपुर, खोराबार गोरखपुर उ.प्र.


सचिन रविंद्र वाकोडे वय २५ वर्षे रा. वडनेर गंगाई ता. दर्यापुर जि. अमरावती 


राहूल शशिकांत तांबट वय २३ वर्ष रा. कोळी वाडा जुहू ता.जि मुंबई


आशिष श्रीधर मत्रे वय २७ वर्ष रा. ग्राम महाण पिंजर


विजय समाधान जुमळे वय २४ रा कळंबा ता. बाळापूर जि. अकोला


ऋषिकेश संजय शेगोकार वय २६ वर्ष रा.आमला ता. दर्यापूर जि. अमरावती


प्रफूल वसरामभाई जोशी वय २४ वर्ष रा. कानोठी ता. सुयेगाम जि. बनसकाठा गुजरात


अमित रामकिसण निंदेकर वय २७ वर्ष रा. गडचांदूर जि. चंद्रपूर


अंकित रामकिसण खातरकर वय २० वर्ष रा. सालबर्डी जि. बैतुल मप्र


नितेश नंदकुमार पाते वय ३२ वर्ष रा. डोबीवली वेस्टे मुंबई


सचिन लिबास बोदडे वय २४ वर्ष रा. पातुर्डा ता. संग्रामपूर जि. बुलढाणा


निलेश गजानन दाभाडे वय २९ वर्ष रा. पातूर्डा बु ता. संग्रामपूर जि. बुलढाणा


बादल अनिल वाघाडे वय ३० वर्ष रा. कान्हेफाटा ता. मावळ जि. पूणे


मनिष हिम्मत जोशी वय २२ वर्ष रा. भाटवर ता. थराद जि. बनाशकांथा, गुजरात


अशोक भूराभाई जोशी वय २३ वर्ष रा. डाभी ता. सोईगाम जि. बनासकाठा


हितेश विरमजी जोशी वय २० वर्ष रा. कानोठी ता. व्हाव जि. बनायसकांठा गुजरात




अशोक वाल्जीभाई जोशी वय २० वर्ष रा. भाटवड ता. व्हाव जि. बनासकाठा गुजरात


भूषन दिनेश बाहकर वय ३० वर्ष रा. ग्राम मुंडगाव ता. अकोट जि. अकोला




मुकेश बच्चुजी ठाकुर यय २६ वर्ष रा. ग्राम ओढवा ता. डिस्सा जि. बनासकांठा गुजरात




विनोद सुखदेव डिक्कर वय ४४ वर्ष रा. लोहारी ता. अकोट जि. अकोला



प्रविण बळीराम सिरसाठ वय २४ वर्ष रा. कळंबेश्वर ता. जि. अकोला


संजय रामनारायण गुप्ता वय ५६ वर्षे रा. गिता नगर नंदीनी पार्क 




रविंद्र विष्णुपंत पांडे वय ६३ वर्षे रा. मुपो खातखेड ता बार्शीटाकळी जि. अकोला


टिप्पण्या