akola-crime-two-wheeler-thieft: दुचाकी चोरट्यांची चोरी करण्याची अजब तऱ्हा : दुचाकी गाडीची चावी चोरुन ठेवायचे पाळत; संधी मिळताच दुचाकी घेऊन फरार…




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  शहरातील सिव्हिल लाईन पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. गाडी चोरी करण्यासाठी ही टोळी एक वेगळी शक्कल लढवत होती. गाडीला किल्ली लागलेली असताना या टोळीतील सदस्य सुरुवातीला फक्त गाडीची किल्ली लंपास करायचे. यानंतर गाडी मालकाने दुसऱ्या किल्लीची व्यवस्था करून गाडी घरी नेल्यानंतर या टोळीतील सदस्य तीन ते चार दिवस या गाडीवर पाळत ठेवायचे आणि संधी साधून गाडी लंपास करायचे अशाप्रकारे ही टोळी गाडीचा हँडल लॉक न तोडता गाडीची चोरी करायचे. 



अकोला सिव्हिल लाईन पोलिसांनी या टोळीतील तीन सदस्यांना अटक केली असून, त्यांच्याजवळून 12 दुचाकी जप्त केल्या आहेत. या टोळीने आणखी काही गाड्या चोरल्या आहेत का ? याचा अधिक तपास पोलीस करीत आहे.





पोलीस स्टेशन


सिव्हील लाईन अकोला


अपराध क्रमांक व कलम


54/2025 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता



आरोपीची नावे 


प्रतिक एकनाथ वसु वय 23 वर्षे रा. लोखंडे लेआउट मोठी उमरी अकोला 


प्रथमेश संजय सरोद वय 20 वर्षे, रा शिलोडा, जि. अकोला 


नेहुल सुरेश जाधव वय 18 वर्षे रा. शाहपूर ता. मंगरूळपीर जि. वाशीम






गुन्हयाची थोडक्यात हकिकत अशा प्रकारे आहे की,  06 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी अंदाजे 01.30 वा चे सुमारास यातील फिर्यादी प्रितेशकुमार रघुनाथ वाकोडे (वय 35 वर्षे महात्मा फुले नगर, स्मशानभुमी जवळ अकोला), त्याचा मित्र  निखील करवते (वय 26, रा. महात्मा फुले नगर, खदान अकोला) असे त्यांचा मित्र श्रीकृष्ण शर्मा (रा. गॅस गोडावुन जवळ न्यु भिमनगर, कृषीनगर अकोला) येथे मुर्ति घेण्याकरीता फिर्यादी यांची दुचाकी MH 30 BK 9989 ने जावुन गाडी त्याच्या घरच्या गेट समोर उभी केली होती.  मुर्ती घेवुन फिर्यादी व त्यांचा मित्र निखील असे दोघेही शर्मा याच्या घरा बाहेर आले. ज्या ठिकाणी दुचाकी उभी केली होती. त्या ठिकाणी गाडी दिसुन आली नाही. आजुबाजुला शोध घेतला असता फिर्यादीची दुचाकी मिळून आली नाही. ही दुचाकी सुझुकी एक्सेस क्रमांक MH 30 BK 9989 ची काळया रंगाची जिचा चेसीस क्र. MB8DP12DJL8318227 व इंजिन क्रमांक AF216409795 अशी जुनी वापरती (अंदाजे किंमत पन्नास हजार रूपये)  गाडीचा  शोध घेतला असता मीळून आली नाही. सदर  दुचाकी कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. ला सदर चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.


या गुन्हयाचे तपासात तांत्रीक माहिती तसेच गोपनीय बातमीदार यांचे कडून मिळालेल्या माहिती वरून सदर गुन्हयात आरोपी प्रतिक एकनाथ वसु वय 23 वर्षे रा. लोखंडे ले आउट मोठी उमरी अकोला,  प्रथमेश संजय सरोद वय 20 वर्षे, रा शिलोडा जि. अकोला यांना 10 फेब्रुवारी 2025 रोजी अटक कार्यवाही करून न्यायालय समक्ष हजर केले. आरोपीतांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला. 


12 दुचाकी जप्त 
जप्त करण्यात आलेल्या दुचाकीची यादी 

दरम्यान आरोपीतांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्यांनी आज पर्यंत अकोला शहरातील वेगवेळ्या ठिकाणा वरून सुध्दा दुचाकी गाडया चोरून नेहुल सुरेश जाधव वय 18 वर्षे रा. शाहपूर ता, मंगरूळपीर जि. वाशीम याचे मार्फतीने विक्री केल्याची कबुली दिली. यावरून आरोपीतांना सोबत घेवून त्यांनी चोरी केलेल्या दुचाकी गाडयाचा शोध केला असता, आरोपीतांनी चोरी केलेल्या 12 दुचाकी गाड्या एकुण किंमत अंदाजे 9,60,000/- रूपयेच्या जप्त करण्यात आल्या आहेत.



ही कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंह ,अपर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी  सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक जयवंत सातव, पो स्टे सिव्हील लाईन अकोला यांचे आदेशा नुसार पो.स्टे. सिव्हील लाईन अकोला येथील अधिकारी व कर्मचारी  पो.उप.नि. विनोद धर्माळे, सुरेश लांडे, पोहवा किशोर सोनोने, पोकॉ मंगेश चुनेवाले, अक्षय तायडे,  प्रदिप पवार,  भूषण मोरे यांनी केली.





टिप्पण्या