tape-hanuman-temple-akola: तपे हनुमान मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा; आमदार खान यांची मागणी, पालकमंत्री फुंडकर यांचा सकारात्मक प्रतिसाद



ठळक मुद्दे 

श्री. तपे हनुमान मंदिर हे तब्बल पाचशे वर्षांहून अधिक पुरातन


‘शहीन शाह बरार हजरत शाह जुल्फिकार मिया रहेमत उल्लाह अलेह’

जुनी दर्गाहला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा 


असदगढ ' किल्ल्याचे नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा 


राजराजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा व निधी उपलब्ध करुन द्यावा 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : जिल्ह्यातील पाचशे वर्षांपेक्षा जास्त पुरातन असलेले श्री. तपे हनुमान मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्याचा कृती आराखडा तयार करण्याची मागणी पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केली. या मागणीला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. आकाश फुंडकर यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला.


जिल्हा नियोजन समितीची पहिली सभा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पाडली. यावेळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघातील श्री. तपे हनुमान मंदिर हे तब्बल पाचशे वर्षांहून अधिक पुरातन असून हिंदू समाजाचे श्रद्धास्थान असल्याचे नमूद केले. सोबतच या मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देत त्याचा विकास करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची मागणी आ. पठाण यांनी केली. 


यावेळी मतदारसंघातील आरपीटीएस रोडवर मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेले ' शहीन शाह बरार हजरत शाह जुल्फिकार मिया रहेमत उल्लाह अलेह ' ही तब्बल 250 वर्ष जुनी दर्गाह आहे. तिचा समावेश सुद्धा क वर्ग तीर्थक्षेत्रात करीत त्याचा कृती आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठविण्याची मागणी त्यांनी केली. 



शहराची ओळख असलेला ' असदगढ ' किल्ल्याचे नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यासाठी नगरोत्थान निधी अंतर्गत नूतनीकरण व सौंदर्यकरण करावे अथवा राज्याच्या पुरातन विभागामार्फत निधी मंजूर करण्याच्या प्रस्ताव शासनाला तातडीने पाठविण्यात यावा, अशी मागणी केली.  



श्री. राजराजेश्वर मंदिराला शासन स्तरावर ' ब ' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी आ. पठाण यांनी केली. 






घरकुलाचा लाभ द्या 


शहरात अनेक ठिकाणी गोरगरीब नागरिक शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून राहत आहे. अश्या नागरिकांना घरकुलाचा लाभ कागद पत्रांअभावी मिळत नाही. परिणामी या नागरिकांना सुद्धा घरकुलाचे लाभ मिळून देत त्यांच्या हक्काचे घरकुल निर्माण व्हावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत त्यांना घरकुलाचे योजनेत बसविण्यात यावे अशी मागणी आ. पठाण यांनी यावेळी केली.

टिप्पण्या