shiv-sena-ubt-party-leaks-akl: अकोल्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गळती; एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश




ठळक मुद्दे

अकोल्यात उद्धव ठाकरे यांच्या गटाला गळती लागली आहे.



अकोल्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आता मशालला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतला आहे.




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड

अकोला (विदर्भ): अकोल्यातील स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष स्वतःपुरता मर्यादित केला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्त्वाची पद दिली जात नसून, निष्क्रिय लोकांच्या खांद्यावर पक्ष वाढविण्याची जबाबदारी दिली जात असल्याचा आरोप करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.



जिल्ह्यातील नेते सर्व प्रमुख पदे स्वतःकडेच ठेवून इतर कार्यकर्त्यांना पुढे जाण्याची संधी देत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. यामुळे सर्व निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या गटाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून  शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचं ऊबाठाचे जिल्हासंघटक  डॉ.विजय दुतोंडे यांनी म्हंटल आहे.




मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर जिल्ह्यातील आणखीही काही उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा आगमी काळात त्यांना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या सोबत जुळणार आल्याचंही विजय दुतोंडे म्हणाले.




शिवसेना ( एकनाथ शिंदे ) मध्ये प्रवेश घेणारे पदाधिकाऱ्यांची नावे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असतानाची पद




डॉक्टर विजय दुतोंडे - जिल्हासंघटक

  


देवश्री ठाकरे - महिला जिल्हा संघटक व माजी नगरसेवका


रेखा राऊत - उपजिल्हा संघटक,  जिल्हा परिषद सदस्य


गजानन बोराळे - उपजिल्हाप्रमुख


अविनाश मोरे - शहर सचिव


गणेश बोबडे- जिल्हा परिषद सदस्य.. 


रुक्मिणी सोनवणे- मूर्तीजापूर मतदार संघ, तालुका संघटक



टिप्पण्या