reservation-post-sarpanch-akl: ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; तालुकानिहाय ग्रामपंचायती व आरक्षण… वाचा संपूर्ण यादी





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : नजिकच्या काळात (दि. 4 मार्चपर्यंत) निवडणूक होणा-या 20 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात आज काढण्यात आली. सोडतीनुसार निश्चित आरक्षणाची माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जाहीर केली आहे. 




तालुकानिहाय ग्रामपंचायती व आरक्षण पुढीलप्रमाणे 




 तेल्हारा:  उमरी (अनुसूचित जाती महिला), अकोली रूपराव (सर्वसाधारण), 


अकोट: केळपाणी (अनुसूचित जमाती महिला), केळपाणी बु. (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), 


मूर्तिजापूर: कव्हळा (अनुसूचित जमाती महिला), शेलू बाजार (सर्वसाधारण महिला), किनखेड (सर्वसाधारण महिला), लंघापूर (सर्वसाधारण).


बाळापूर: हिंगणा निंबा (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), शिंगोली (सर्वसाधारण),


बार्शिटाकळी: भेंडीसूत्रक (सर्वसाधारण महिला), चोहोगांव (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), 


पातूर: सांगोळा (सर्वसाधारण महिला), कोठारी बु. (सर्वसाधारण), आस्टुल (सर्वसाधारण महिला), भंडारज बु. (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), तुलंगा बु. (सर्वसाधारण).




अकोला: आखतवाडा (सर्वसाधारण स्त्री), अनकवाडी (अनुसूचित जाती), मजलापूर (सर्वसाधारण).



         जाहीर केलेली यादी



टिप्पण्या