- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
rampcon-exhibition-akola-city: बांधकाम व स्थापत्य क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे ‘रॅम्पकॉन’ प्रदर्शन अकोला शहरात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: पश्चिम विदर्भातील बांधकाम व स्थापत्य क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे ‘रॅम्पकॉन’ प्रदर्शन अकोला शहरात आयोजित करण्यात येत आहे. ऍडव्हान्समेंट इन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस इन कंट्रक्शन टेक्नॉलॉजी अर्थात रॅम्पकॉन या प्रदर्शनीचे महानगरात आयोजन केले आहे. अकोला, बुलढाना, वाशिम, हिंगोली, अमरावती व यवतमाळ या सहा जिल्ह्यातील इंजीनियर्स, आर्किटेक्ट, कंत्राटदार व व्यवसायिक, घरे बांधणारे, इंटीरियर डेकोरेशन आदी संबधीत बांधकाम व स्थापत्य विश्वातील नवीन बदल, शोध, तंत्रज्ञान, उपकरणे आदींची माहिती घेवून 25 ते 27 जानेवारी पर्यंत स्थानिक मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात हा तीन दिवसीय महोत्सव होत असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या प्रदर्शनीत बांधकाम क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान, साहित्य, डिझाईन, आणि सेवा यांचे दर्शन घडणार असून 100 पेक्षा जास्त स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सिमेंट, कॉक्रीट, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल्स, टाइल्स, हार्डवेअर, फर्निचर, सजावट साहित्य, गृहनिर्माण योजना, फायर फायटिंग सिस्टीम्स, इंटीरियर डिझाईन, क्रॅक रिपेअर तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती, वित्तीय व्यवस्थापन, आणि इतर अनेक विषयांचा समावेश राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रदशनीत बांधकाम व स्थापत्य क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने व चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. यातून उद्योजक, कंत्राटदार, अभियंते, आर्किटेक्ट, विद्यार्थी, आणि सर्वसामान्य नागरिकांना नवीन ज्ञान व प्रेरणा मिळेल.
रॅम्पकॉन प्रदर्शनी ही पश्चिम विदर्भातील बांधकाम व स्थापत्य क्षेत्रासाठी ज्ञान व नवीन संशोधन व उपक्रम बघण्याचे एक प्रमुख व्यासपीठ ठरली आहे. मागील काही वर्षांपासून नियमितपणे आयोजित होणारी ही प्रदर्शनी राज्यातील ख्यातनाम मान्यवरांचेही लक्ष वेधून घेत आहे.
या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून आयकॉन स्टील आणि विठ्ठल इटोप काम करत आहेत. तर अल्ट्राटेक जगवार, वारी सोलर, मेटारोल स्टील्स, राजोरी स्टील्स, मॅक एलिवेटर आदी कंपन्या सहप्रायोजक म्हणून सहभागी होत आहेत. असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, अकोला व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनीला सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पत्रकार परिषदेला एसीसीईचे सचिव अनुराग अग्रवाल, आयआयएचे सचिव सर्वेश केला, आयोजन सचिव अभिजित परांजपे, जीसी सदस्य पंकज कोठारी, प्रा. इस्माईल नाजमी, आयआयए प्रदेश सदस्य सुमित अग्रवाल उपस्थित होते. संचालन कपिल ठक्कर यांनी तर आभार अनुराग अग्रवाल यांनी मानले.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी एसीसीईचे सदस्य अजय लोहिया, रिजवान कुरेशी, संजय भगत, चंद्रशेखर मुखेडकर, श्याम ठाकूर, मयूर सिंघनिया, कपिल ठक्कर, इंद्रनील देशमुख, नरेश चौधरी, नरेश अग्रवाल, विशाल तडस, कुशल जैन, पंकज भाटकर, शिवाजी भोरे व आयआयए सदस्य अमित राठी, निलेश मालपाणी, मनोज मोदी, जयप्रकाश राठी, सोहेल खान, अमित फोकमारे, सागर हेडा, नीरज हेडा, रोहन चोपडे, आयुष गुप्ता समवेत एसीसीई व आयआयएचे पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा