rampcon-2025-exhibition-akl: नागरी विकासाच्या दृष्टीने रॅम्पकॉन सारख्या प्रदर्शनीची गरज; रॅम्पकॉन 2025 प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन



ठळक मुद्दा 

प्रदर्शनीस पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: नागरी विकासाचा पाया हा निर्माण व स्थापत्य विश्व असून गृह संकल्पनेच्या दृष्टिकोनातून अशा रचनात्मक उपक्रमांची सातत्याने समाजाला गरज असते. अशी गरज अश्या रॅम्पकॉन प्रदर्शनीच्या माध्यमातून पूर्ण होत असून ही महानगरासाठी भूषणावह बाब असल्याचे मत रॅम्पकॉन प्रदर्शनी 2025 च्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी केले.




असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स अकोला व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स अकोलाच्या संयुक्त विद्यमाने मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात तीन दिवसीय रॅम्पकॉन प्रदर्शनीचा शनिवारी थाटात प्रारंभ झाला. या सोहळ्यात उडघाटक म्हणून खासदार अनुप धोत्रे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार साजिद खान पठाण, रुहाटीया गृप ऑफ इंडस्ट्रीजचे सीएमडी शिवप्रकाश रुहाटीया, प्रदर्शनी आयोजन समितीचे अभिजित परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी मान्यवरांनी जल्लोषात फीत कापून व दीप प्रज्वलन करीत सर विश्वसरय्या यांच्या प्रतिमा पूजनाने या सोहळ्याला थाटात प्रारंभ केला. 



यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनेक वर्षापासून महानगरातील बांधकाम व स्थापत्य विश्वातील बदलत्या घडामोडी, नवज्ञान नागरिकांच्या जनजागरणासाठी सातत्याने आयोजित करीत असणाऱ्या या रॅम्पकॉन प्रदर्शनीचे कौतुक केले. महानगराचे पारंपारिक विकास वैभव असणाऱ्या या प्रदर्शनीची उपयोगिता यावेळी प्रतिपादित करीत आयोजन समितीच्या या उपक्रमास आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात. मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ व मोमेंटो देऊन करण्यात आले. मान्यवरांनी प्रदर्शनीतील प्रत्येक स्टॉलची पाहणी करीत बांधकाम, गृह सजावट, साहित्याची माहिती जाणून घेत स्टॉल धारकांशी संवाद साधला. यावेळी अनेक स्टॉल धारकांनी मान्यवरांचे उस्फूर्त स्वागत केले.




दरम्यान रात्री जिल्ह्याचे पालकमंत्री ना. आकाश फुंडकर यांनी प्रदर्शनीस भेट देत आपल्या शुभेच्छा दिल्यात.


सोमवार दिनांक 27 जानेवारी पर्यंत नित्य सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनीत पहिल्याच दिवशी नागरिक, व्यवसायिक व उद्योजकांनी एकच गर्दी करीत प्रदर्शनीला भेट दिली. 



यावेळी प्रदर्शनीच्या स्वागतकारांनी अनेक मान्यवरांचे यावेळी उद्बोधन करून स्वागत केले. संचालन व आभार आयआयएचे सचिव सर्वेश केला यांनी केले. 



रविवार 26 जानेवारी रोजी प्रदर्शनीतील सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑडोटोरियम सभागृहात विविध विषयांच्या तज्ज्ञांची मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन असो.ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, अकोला व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स अकोलाच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी केले.




Rampcon प्रदर्शनी मधे प्रवेश निःशुल्क असून, अकोलेकरांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 



या ठिकाणी विविध खाद्य वस्तूंचे स्टॉल देखील लावण्यात आलेले आहेत. पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी देखील हजेरी लावली.




टिप्पण्या