- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: प्रयागराज महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्या निमित्त मंगळवारी रात्री उशीरा 'संगम नोज' परिसरात अचानक चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अकोल्यातील डाबकी रोड गजानन महाराज मंदिर परिसरातील महिला बेपत्ता असल्याची माहिती शिवसेनाचे माजी नगरसेवक शशिकांत चोपडे यांनी दिली. शकुंतला अंबादास नागापुरे असे या महिलेचे नाव आहे.
सध्या महाकुंभ मेळावा सुरू असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना 'संगम नोज' या ठिकाणाचे फार आकर्षण दिसून येत आहे. त्यामुळेच या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दरम्यान अकोल्यातील भाविक सौ. शकुतला अंबादास नागापूरे या प्रयागराज येथे महास्नान करिता गेल्या होत्या. मात्र मंगळवारी रात्री अचानक झालेल्या चेंगराचेंगरी घटनेत त्या हरविल्या आहेत. दरम्यान नागापुरे यांचे कुटुंब त्यांचा शोध घेत आहेत.
शशिकांत चोपडे यांचे आवाहन
शकुंतला अंबादास नागापुरे काकू या प्रयागराजला गर्दी मध्ये हरवल्या आहे. अकोल्यामधील गेलेल्या भाविकांना कोणाला त्या दिसल्या तर शिवसेना माजी नगरसेवक शशिकांत वामनराव चोपडे मो. 9922033634 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन चोपडे यांनी केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा