- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मस्साजोग गावाचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आज अकोल्यात यशवंत भवन येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
प्रकाश आंबेडकर यांच्याशी देशमुख कुटुंबीयांनी सुमारे अर्धा तास बंद द्वार चर्चा केली. तर आंबेडकर यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी असणार असल्याचं आश्वासन दिलं.
या प्रकरणात न्यायालयीन लढाई करिता पुढे कसं जायचं या संबंधात मार्गदर्शन केलं आल्याचं धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. धनंजय देशमुख हे मृतक संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी, मुलगा विराज आदी उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा