Narendra-Mayi-passed-away: हरहुन्नरी चित्रकला शिक्षक नरेंद्र मायी काळाच्या पडद्याआड




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक नरेंद्र उर्फ राजू मायी यांचे आज शुक्रवार,  31 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर शनिवार, 1 फेब्रुवारी  रोजी मोहता मिल येथील स्मशानमभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर नवीन जैन मंदिर देवरावबाबा चाळ येथून शनिवारी  सकाळी 10 वाजता निघेल.



नरेन्द्र मायी यांचा जवळ पास एक महिन्या आधी छोटा अपघात झाला होता. ते खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले असल्याचे त्यांच्या सहकारी शिक्षक मित्रांनी सांगितले.



अकोल्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक  क्षेत्रात त्यांचा  वावर होता. चित्रकला, संगीत क्षेत्रात त्यांची विशेष रुची. विद्या भारती अकोला जिल्ह्याचे पूर्व संस्कृती ज्ञान परीक्षा प्रमुख म्हणूनही नरेंद्र मायी यांनी काम पाहिले.  त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विद्या भारतीची संस्कृती ज्ञान परीक्षा ही अकोला जिल्ह्यात सर्वदूर पोहोचविली. 



सर्वांशी मिळून मिसळून राहणे हा त्यांचा स्वभाव. त्यांच्या गंमती-जमती, हसरा चेहरा यामुळे सान थोरांचे ते मित्र बनून जात होते. आणि हे स्नेहसंबंध त्यांनी सदैव जपले. विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक होते. सहकारी शिक्षकांचे घनिष्ट मित्र. अश्या हरहुन्नरी कलाकार कलाप्रेमी हाडाचे चित्रकला शिक्षक नरेन्द्र मायी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखद घटनेतून संपूर्ण मायी परिवाराला सावरण्याची शक्ती प्रदान करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. भारतीय अलंकार न्यूज 24 तर्फे नरेन्द्र मायी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.




टिप्पण्या