- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
maharashtra-security-force- akl: अकोला जीएमसीत महाराष्ट्र सुरक्षा बल तैनात: सक्रिय दलाल हद्दपार; चोऱ्यांचे प्रमाण नगण्य, डॉक्टरांवरील हल्ले कमी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स (एमएसएफ) ही महाराष्ट्र, भारतातील एक सरकारी सुरक्षा एजन्सी आहे. जी 2010 मध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कायदा 2010 अंतर्गत स्थापन करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारची कार्यालये, उपक्रम, अशा सर्व आस्थापनांचे कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना अधिक चांगले संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. अकोला मधे देखील ही यंत्रणा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात सेवारत असून, आज रोजी 96 सुरक्षा रक्षक अधिकारी येथे सेवा देत असून रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी, विद्यार्थी तथा संपूर्ण परिसराला दिवसरात्र सुरक्षा प्रदान करण्याचे व्रत हाती घेतले असल्याची माहिती सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील महाराष्ट्र सुरक्षा बलचे सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी गणेश अणे यांनी दिली.
आज बुधवार 15 जानेवारी रोजी कार्यालय महाराष्ट्र सुरक्षा बल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरक्षा बाबत गणेश अणे यांनी सविस्तर माहिती दिली.
मुंबई येथे 26 / 11 चा हमला झाला त्यावेळी शासकीय संस्था अति संवेदनशील सरकारी कार्यालये यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला. उपलब्ध मनुष्यबळावर हे शक्य वाटत नव्हते. यासाठी सरकारने समिती नेमली. त्यानंतर अर्ध सैनिक दल प्रमाणेच पोलीस खात्याचे अर्ध पोलीस दल ही पोलीस यंत्रणा 2010 मध्ये निर्माण करण्यात आली. ज्याला महाराष्ट्र सेक्युरीटी फोर्स म्हंटल्या जाते.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा अधिनियम 2010 नुसार ही सुरक्षा यंत्रणा गृहखाते अंतर्गत स्थापन केली. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC) ही एक कॉर्पोरेट संस्था सारखी असते.ज्याचे प्रमुख अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग हे असतात. नंतर पोलीस महासंचालक त्यानंतर पोलीस महासंचालकांचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी या संपूर्ण यंत्रणेवर देखरेख करतात. अकोला येथील यंत्रणेचे नागपुर मुख्यालय आहे. यामध्ये भरती होणार सुरक्षा रक्षक बाहेरून घेत नाही. तर पोलीस भरती मधे जे उमेदवार प्रतिक्षा यादीत असतात, त्यांना यात पूर्णपणे संधी दिली जात असल्याचे गणेश अणे यांनी सांगितले.
भरती झालेल्या उमेदवारास पोलिसांप्रमाणे पूर्ण प्रशिक्षण दिले जाते शस्त्र चालवण्यास देखील प्रशिक्षित केले जाते. महाराष्ट्र राज्यात पोलिसांना जे अधिकार आहेत, ते संपूर्ण अधिकार सुरक्षा रक्षकांना प्रधान केले जातात. भारतीय न्याय संहिता 2023 कलम 132 अन्वये सुरक्षा रक्षकांना कायद्याने सुरक्षितता देण्यात आली आहे. त्यांना लोकसेवक म्हणून गणल्या जाते. सुरक्षारक्षकांना वा अधिकाऱ्यांना पोलिसांप्रमाणे सर्व अधिकार असले तरी एखादी घटना घडल्यास त्याचा तपास करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही, अशी माहिती देखील गणेश अणे यांनी यावेळी दिली.
विमानतळ, सेंट्रल फोर्स, मुंबई मेट्रो, रेल्वे स्टेशन, मुंबई लोकल, महाराष्ट्र सदन, आर पी एफ, मुंबई पोलीस, मनपा, कोर्ट, बँक आदी ठिकाणी सुरक्षारक्षक सेवा प्रदान करतात अकोल्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 96 सुरक्षा रक्षक व अधिकारी सेवा देत आहेत तसेच महाराष्ट्र स्टेट बँक करन्सी येथे सेवा देत आहेत यवतमाळ येथील जिल्हा न्यायालयात देखील सुरक्षा रक्षक तैनात आहेत, असे देखील गणेश अणे यांनी सांगितले. महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये भरती झालेला उमेदवार हा वयाच्या 58 वर्षापर्यंत सेवेत राहू शकतो त्यांना शासकीय नियमानुसार सर्व सुट्ट्या मिळतात मात्र त्यांची करारा पद्धतीनुसार नियुक्ती होते आणि दरवर्षाला हा कंत्राट स्वयंचलित नूतनीकरण होतो मात्र त्या उमेदवारांनी सेवेमध्ये कसूर केल्यास त्याचा कंत्राट रद्द करण्यात येतो. या उमेदवारांना सुरक्षा अधिकारी म्हणून बढती देखील मिळते. दोन तारे त्यांच्या खांद्यावर लागतात ही अभिमानाची बाब असते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सन 2017 मधे सुरक्षा रक्षक, महिला सुरक्षा रक्षक, हत्यार सुरक्षा रक्षक असे एकूण सुरुवातीला 51 लोक दिले होते. आता त्यामध्ये 40 नवीन भरती केलेले आहे आणि 05 अधिकारी असे एकूण 96 लोकसेवक येथे कार्यरत आहेत. तसेच नव्याने उभारलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येत्या काही दिवसात 54 सुरक्षारक्षक सेवा देणार आहेत, अशी माहिती देखील गणेश अणे यांनी दिली.
मागील दोन वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शंभर टक्के चोऱ्या बंद झाल्या आहेत. डॉक्टरांवर हल्ले झाले नाहीत. सुरक्षा रक्षक माणुसकीच्या नात्याने येथे येणाऱ्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करतात. गरज पडल्यास तात्काळ रक्तदानही करतात. पूर्वी येथे मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय होते. परिसरात दलालांचा सुळसुळाट होता. हे दलाल गोरगरिबांची वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली फसवणूक करायचे, मात्र आता येथून दलाल पूर्णपणे हद्दपार करण्यात आले आहे. ही महाराष्ट्र सुरक्षा बलची मोठी उपलब्धि म्हणावी लागेल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात गणेश अणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र सुरक्षा बल
Active brokers
Akola GMC
attacks on doctors
Ganesh Aney
Maharashtra Security Force
police
spo
thefts
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा