jalgaon-pushpak-train-accident : आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या धावत्या रेल्वेतून उड्या; समोरून येणाऱ्या रेल्वेने प्रवाशांना उडविले

photo: social media 



भारतीय अलंकार न्यूज 24

महाराष्ट्र: जळगाव येथे रेल्वे गाडीने काही प्रवाशांना उडावल्याची भीषण घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याच्या भीतीने धावत्या रेलगाडी मधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यामध्ये काही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव- मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि पारधाडे स्थानक दरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे. 



मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुमकडून माहिती देण्यात आली की, कर्नाटक एक्सप्रेस बरोबर एक अपघाताची घटना घडली, ज्यामध्ये 7 ते 8 लोक जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 


दरम्यान जळगाव जिल्हा प्रशासनाकडून  तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या आहेत. प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस अधिकारी देखील पोहचले आहेत. रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील दुर्घटनेनंतर मदतकार्य करत आहेत. ग्रामीण रुग्णालय, खाजगी रुग्णालय आणि शासकिय वैद्यकीय महाविद्यालय या तीन रुग्णालयाकडून मदत घेतली जात आहे. 



प्राथमिक माहितीनुसार, 6 ते 8 चा आकडा सांगितला जात आहे. अजून अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही. तर जखमींवर पाचोरा येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कळते.



टिप्पण्या