health-atm-workers-Insurance: कामगार विमा योजनेतर्फे ‘हेल्थ एटीएम’ कार्यान्वित




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना येथे  ‘हेल्थ एटीएम मशिन’ कार्यान्वित करण्यात आली असून, त्यासमोर उभे राहून विमाधारक कामगारांना आरोग्याशी संबंधित अनेक बाबींची विनामूल्य तपासणी करता येणार आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते या यंत्रणेचा शुभारंभ आज झाला.

संस्थेच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. उज्ज्वला माळवे, विमा वैद्यकीय अधिकारी, स्मिता सगणे, प्रीती कराळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आरोग्याच्या दृष्टीने चांगली सुविधा निर्माण झाली असून, विमाधारक कामगार रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार श्री. सावरकर यांनी केले. 



या मशिनसमोर उभे राहून उंची, वजन, बीएमआय, बॉडी फॅट, मसल मास,  त्वचेखालील चरबी (subcutaneous fat), व्हिसरल फॅट,  बॉडी वॉटर. प्रोटीन, बीएमआर, बोन मास, मसल रेट, शरीराचे तापमान, ब्लड ऑक्सिजन, रक्तदाब, दृष्टी, हिमोग्लोबीन,  एचबीएवनसी, लिपीड प्रोफाईल आदी तपासणी करता येणार आहे. 



राज्य कामगार विमा सेवा दवाखान्यात नोंदणीकृत विमाधारक कामगारांना विनामूल्य औषधोपचार, तपासणी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती आदी लाभ दिले जातात, असे डॉ. माळवे यांनी यावेळी सांगितले.  सतीश तायडे, योगेश कोल्हे, दुर्गेश वानखडे, मनीषा पाटील, आकाश झांबरे, अशोक रोठे, भास्कर जावरे, सनी सारवान, अंजली आगडे, राहूल ठाकरे, पुष्कर इंगळे, अपूर्वा रायराम आदी उपस्थित होते. हा दवाखाना रामदासपेठेत के. बी. बहल यांच्या इमारतीत (शांतीनिवास) आहे.


टिप्पण्या