gbs-disease-reached-in-akola जीबीएस हा दुर्मिळ आजार आता अकोल्यातही पोहोचला; 4 रुग्णांवर उपचार सुरू, एक अतिदक्षता विभागात



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : पुण्यात आढळून आलेल्या जीबीएस अर्थात गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा दुर्मिळ आजार आता अकोल्यातही पोहोचला आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून नये तर योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.



अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जीबी सिंड्रोमच्या 4 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. यातील 1 रुग्ण अति दक्षता विभागात उपचार घेत असून उपचार घेणाऱ्या चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हंटल आहे. 



या आजाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा आजार कोरोनासारखा संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर खबरदारी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.रवी खंडारे यांनी केले आहे.




टिप्पण्या