- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
food-and-drug-administration: GMD मार्केटमध्ये अन्न व औषध प्रशासन द्वारा मोठी कारवाई; 9 लाख किमतीचा अवैध सलाईन साठा जप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने अकोल्याला मोठी कारवाई करण्यात आली आहे. शहरातील सिव्हिल लाइन्स रोड वरील GMD मार्केटमध्ये असलेल्या दास सर्जिकल या प्रतिष्ठानाच्या गोदामाची तपासणी करीत सलाईन औषधीचे एक हजार बॉक्स असा अंदाजे 9 लाख किमतीचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, GMD मार्केटमधील दास सर्जिकल यांनी अन्न व औषधी प्रशासनाची परवानगी न घेता विना परवाना गोदामात मोठ्या प्रमाणात सलाईन बॉक्सची साठवणूक केली आहे.
या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी धाडसत्र राबवित गोदामातून 1 हजार सलाईनचे बॉक्स जप्त केले आहे. याचे बाजार मुल्य अंदाजे 9 लाख रुपयेच्यावर आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात एका बॉक्समध्ये चाळीस सलाईन असून बहुतांश बॉक्स मधील सलाईन ही एप्रिल 2025 ला एक्सपायर होणार आहे.
या कारवाईमध्ये gmd मार्केट मधील दास सर्जिकल मधून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अंदाजे 9 लाखाच्यावर मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन विभाग सहाय्यक आयुक्त मनीष गोतमारे यांनी दिली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा