crime-news-drug-smuggling-bt: अमली पदार्थ तस्करी प्रकरण: आठव्या आरोपीस शेगाव येथुन अटक, एलसीबी अकोलाची कारवाई



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे कडून पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथील NDPS ॲक्ट (MD) अन्वये दाखल गुन्हयातील आठव्या आरोपीस शेगाव येथुन अटक करण्यात आली आहे.


स्थानिक गुन्हे शाखा अकोलाने 24 डिसेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन बार्शिटाकळी अकोला हद्दीत गुप्त बातमीदाराच्या बातमी वरून NDPS ॲक्ट अन्वये अमली पदार्थ तस्करी प्रकरणात कारवाई करून यातील मुख्य आरोपी आदिल मोहम्मद शमीम अन्सार (वय 36 वर्ष रा.वसई मुंबई) व त्याच्या 3 साथदारांजवळुन एकुण 5 किलो 548 ग्रॅम अमली पदार्थ किंमत अंदाजे 1,38,70,000 रुपयेचा व ईतर साहित्य असा एकुण 2, 38,70,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेवुन, पो.स्टे. बार्शिटाकळी अकोला येथे अप क. 532/2024 कलम 22 (सी), 8 (सी), 25, 29 NDPS ॲक्ट अन्वये दाखल करण्यात आला होता. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी करीत आहेत. घटनास्थळावरून 05 आरोपींना अटक करण्यात केले होते. ते पाचही आरोपी अदयाप पावेतो न्यायालयीन कोठडीत अकोला कारागृहात आहेत.


या गुन्हयातील जप्त अंमलीपदार्थ रासायनिक विश्लेषणासाठी न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा अमरावती येथे दाखल केला असता तो अंमलीपदार्थ हे मेफेड्रॉण ड्रग (MD) असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.


आज  04 जानेवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील फरार आरोपी इमरान खान असलम खान (वय 42 वर्ष, रा. सुरत) हा शेगाव येथे येत आहे. अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस निरिक्षक शंकर शेळके हे पथकासह रवाना होवुन, आरोपीस शेगाव येथुन ताब्यात घेवुन त्यास अटक केली. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.


सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक  बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शंकर शेळके, स.पो.नि. विजय चव्हाण, पोउपनि, गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद पठाण स्थानिक गुन्हे शाखा, अकोला तसेच स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अमंलदार सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, वसिमोद्दीन, प्रविण कश्यप, स्वप्निल खेडकर, धिरज वानखडे, स्वप्निल चौधरी, मोहम्मद आमीर यांनी पार पाडली.

टिप्पण्या