crime-bail-granted-to-accused: जीवघेणा हल्ल्यातील आरोपीचा जामीन अर्ज मंजूर

अधिवक्ता नजीब शेख यांचा नेमका युक्तिवाद 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिच्या पालकांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप असलेल्या आरोपीची न्यायलयाने अटी व शर्थीसह 25 हजार रुपयेच्या जातमुचलक्यावर आरोपीचा जामीन अर्ज स्वीकारला. न्यायालयात आरोपीची बाजू ॲड. नजीब शेख यांनी सक्षम मांडली.




आरोपी हा पीडित अल्पवयीन मुलीला गैरहावभाव करून विनयभंग करायचा.  या संदर्भात विचारपूस करण्यासाठी गेले असता आरोपींनी  तिच्या पालकांवर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांना घाणेरड्या शिवीगाळ करून जखमी केले. यानंतर अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.  न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांची उलटतपासणी ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी काही अटींवर आरोपीचा जामीन अर्ज स्वीकारला.



याबाबत थोडक्यात हकिकत अशी की, एका 14 वर्षीय मुलीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, तिच्या घराजवळ राहणारा मुलगा तिला पाहून गैर हावभाव करत असे.  मात्र ती आरोपींच्या कृतीकडे दुर्लक्ष करत असे. 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ती तिच्या चुलत भाऊ सोबत पतंग उडवत असताना, आरोपीने गच्चीवर जाऊन तिच्याशी गैर भाषेत संभाषण सुरू केले.  या घटनेने घाबरलेल्या मुलीने खाली येऊन आई-वडिलांना घटनेची माहिती दिली.  प्रकरण गांभीर्याने घेत पालक आरोपीचे घरी पोहोचले तेथे आरोपीने पुन्हा शिवीगाळ सुरू केल्याने तेथे जमाव जमला आणि जमावातील कोणीतरी त्याच्यावर वीट फेकून मारहाण केली.  दरम्यान, त्यांनी मदतीसाठी आवाहन केले असता दोन युवक मदतीसाठी तेथे आले. मात्र आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला करून त्यांना जखमी केले.  अश्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 20 वर्षीय शेख शाहिद शेख कासम याच्याविरुद्ध कलम 75,78,79,125 (अ) 296,351 (2),351 (3), 352, पोक्सो कलम 12 अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.  


आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला कारागृहात पाठवले.  कारागृहात असताना आरोपींनी अधिवक्ता नजीब एच शेख यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला.  या याचिकेवर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. क्षीरसागर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.  


आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना अधिवक्ता नजीब शेख म्हणाले की, हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असून त्याला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तोच आरोपी एकाच वेळी दगड आणि पाईपने कसा हल्ला करू शकतो.  तक्रारदार आणि आरोपी यांच्या घराच्या मध्ये इतर अनेक घरे येत आहेत. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीचा जामीन अर्ज स्वीकारला.

टिप्पण्या