cleans-garbage-morna-river-: मनपा द्वारा मोर्णा नदीतील कचरा व जलकुंभी साफ; हिंगणा ते नायगाव पर्यंतचा भाग स्वच्छ



ठळक मुद्दा 
हिंगणा ते नांयगाव पर्यंतच्‍या नदी पात्रामधील जलकुंभी आणि काठावरील निर्माल्‍य कचरा काढून स्‍वच्‍छ कऱण्यात आली.





भारतीय अलंकार 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला शहरातील मध्‍य भागातून वाहणारी मोर्णा नदीत शहरातील काही नागरिकांव्‍दारे कचरा व निर्माल्‍य टाकण्‍यात येत असते तसेच दरवर्षी उन्‍हाळ्याचे काही दिवसापुर्वी नदीपात्रात जलकुंभी वाढविण्‍यास सुरूवात होऊन नदी काठावरील भागांमध्‍ये डासांचा प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात भर पडून यामुळे विविध प्रकारची रोगराई वाढण्यात सुध्‍दा भर पडत असतो. 




याचसोबत दरवर्षी नदी पात्रातील जलकुंभी काढण्‍याच्‍या कामामध्‍ये मनपा प्रशासनाला लाखो रुपये खर्च करावे लागतात. यावर कायमस्‍वरूपी तोडगा काढण्‍याच्‍या दृष्‍टीने मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्‍या आदेशान्‍वये स्‍वच्‍छता निरीक्षकांना नदी पात्रामध्‍ये कचरा आणि जलकुंभी आढळयास ती तातडीने काढून नदी स्‍वच्‍छ ठेवण्‍याची जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे.




या अनुषंगाने आज 18 जानेवारी रोजी सकाळी मनपा स्‍वच्‍छता विभागाव्‍दारे हिंगणा ते नांयगाव पर्यंतच्‍या नदी पात्रामधील जलकुंभी आणि नदी काठावरील निर्माल्‍य कचरा काढून स्‍वच्‍छता करण्‍यात आली आहे.  





तसेच नदी पात्रातील स्‍वच्‍छता हे आवश्‍यकते नुसार करण्‍यात येणार असल्‍याबाबत मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे यांनी कळविले आहे.  



               

भारतीय संस्‍कृतीमध्‍ये आपण नदीला पवित्र मानतो नदीचा पावित्र्य कायम ठेवण्‍यासाठी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी नदी पात्रात निर्माल्‍य आणि कचरा न टाकता नदी स्‍वच्‍छ ठेवण्‍याच्‍या कार्यामध्‍ये सहकार्य करण्‍याचे आवाहन मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे यांनी केले आहे.



टिप्पण्या