builder-mishra-attack-case-akl: बहुचर्चित बिल्डर रामप्रकाश मिश्रा हल्ला प्रकरण: मुख्य सूत्रधार अखेर गजाआड; सुपारी देणारा आजपर्यत मिश्रा यांचे संपर्कात !




ठळक मुद्दे


अखेर सर्व जिल्ह्याचे लक्ष लागुन असलेल्या " मिश्रा हमला" प्रकरणाची स्थानीक गुन्हे अकोला कडुन यशस्वी उकल.


मुख्य सुत्रधार निघाला मिश्रा यांचे रोजचे संपर्कातील व्यक्ती



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बहुचर्चित विश्व हिंदू परिषद तथा भाजपा नेते बिल्डर रामप्रकाश मिश्रा जीवघेणा हल्ला प्रकरणाचे उकल अखेर आज अकोला पोलिसांनी केली आहे. या हल्ल्याची सुपारी देणारा आरोपीला मध्यप्रदेश मधुन अटक केली आहे तर मुख्य सुत्रधारला नागपुर मधून ताब्यात घेण्यात आले आहे.


मुख्य सुत्रधार हा मिश्रा यांचे रोजचे संपर्कातील व्यक्ती असून त्याने आर्थिक व्यवहाराचे वादातून कट रचल्याची कबुली दिली आहे. मुख्य सुत्रधार अमित नागदिवे याचेवर यापुर्वी क्राईम रेकॉर्डवर फसवणूकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे. दरम्यान आज दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, दोन्ही आरोपींना सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.




30 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादी जखमी रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा (वय 55 वर्ष रा. माधव नगर, गौरक्षण रोड अकोला.) यांनी पोलीस स्टेशन खदान अकोला येथे रिपोर्ट दिला की, ते नागपुर येथून अकोला त्याचे राहते घरी रात्री दहा वाजताच्या सुमारास परत आल्यानंतर ते त्यांचे कार्यालय समोर वाहनातुन उतरत असतांना अज्ञात दोन ईसमांनी त्यांचेवर मोटार साययकल वर येवून धारदार चाकुने जिवानीशी ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून आरोपी हे घटनास्थळावरून पळून गेले. अश्या फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे खदान अकोला येथे अपराध नं 628/24 कलम 109,3 (5) भा. न्या. सं प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासावर घेतला होता.


विशेष म्हणजे या गुन्ह्यात आरोपीनी गुन्हा करतांना कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. मोबाईल चा सुध्दा वापर केला नव्हता. स्थानीक गुन्हे शाखा अकोलाचे पथकाने अथक मेहनत करून 150 कि.मी. फुटेजची तपासणी करून गोपनिय बातमीदार खबऱ्या मार्फत हमला करणारा मुख्या आरोपी पवन कुंभलकर यास 15 सप्टेंबर 2024 रोजी अटक केली होती. तेव्हा त्याने इतर साथीदारांसह सुपारी देणारा आरोपी मुश्ताक सिमनानी याचे नाव सांगितले होते. तेव्हा पासुन सुपारी देणारा आणि पवनचे ईतर तीन साथीदार हे मोबाईल बंद करून फरार झालेले होते.



आरोपीतांचे शोधासाठी पोलीस अधीक्षक अकोला यांनी स्थागुशा आणि पो. स्टे खदानचे दोन पथक तयार केलेले होते. शेवटी 10 जानेवारी 2025 रोजी फिर्यादी कडून तीन आरोपीची माहीती देणा-यास तीन लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.


12 जानेवारी 2025 रोजी नागपुर ग्रामीण LCB चे सपोनि आशिष ठाकुर व त्यांचे पथक त्यांचे तपासात सरणी जि. बैतुल या गावात आरोपी शोध कामी गेले असता त्यांना अचानक मुश्ताक साबरी सिमनानी हा मिळून आला. ही माहीती त्यांनी पो. नि. शंकर शेळके, स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांना दिली.


पोलीस अधिक्षक अकोला यांचे आदेशाने स्थागुशा अकोला, येथील पथक हे रवाना झाले होते. आरोपी मुश्ताक सिमनानी अब्दुल खालीक हाफीज (वय 50 वर्ष रा. कब्रस्थान रोड, मोमीन पुरा नागपुर) यास नागपुर येथून ताब्यात घेण्यात आले. पुढे स्थागुशा अकोलाचे पथक यांनी गोपनिय माहीती व विचारपुस करून साबरी यास सुपारी देणारा सुत्रधार कोण आहे? याची माहीती घेतली असता, सुपारी देणारा  अमित गुलाबराव नागदिवे (वय 39 वर्ष व्यवसाय - मेडीकल ॲडमीशनची कन्टलसन्टी, मायनींग, रा. टाटा कॅपीटल हाईट्स मेडीकल चौक नागपूर.) हा असुन त्याचे फिर्यादी रामप्रकाश मिश्रा त्याचे सोबत 70 लाखांचा आर्थिक व्यवहार होता. पैसे परत करण्याचे कारणावरून रामप्रकाश मिश्रा यास मारण्याची सुपारी दिल्याबाबत या आरोपीतांनी कबुली दिली आहे. विशेष बाब म्हणजे सुपारी देणारा आजपर्यंत फिर्यादी मिश्रा यांचे संपर्कात होता. व हमला झाल्यावर देखील मिश्रा यांचे प्रकृतीची विचारपुस करण्यास हॉस्पीटलला गेला होता. आरोपीतांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन खदान, अकोला यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 18 जानेवारी पर्यंत पीसीआर देण्यात आला.





ही कारवाई पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक  अभय डोंगरे , पो.नि. शंकर शेळके स्थागुशा अकोला, यांचे मार्गदर्शनात सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, पो. अमंलदार दशरथ बोरकर, अब्दुल माजीद रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, भिमराव दिपके, अशोक सोनाने, स्वप्नील खेडकर तसेच चालक प्रशांत कमलाकर, राहुल गायकवाड आणि सायबरचे आशिष आमले यांनी केली आहे.


टिप्पण्या