builder-mishra-assault-case-: बिल्डर रामप्रकाश मिश्रा प्राणघातक हल्ला प्रकरण: फरार तीन आरोपींवर तीन लाखाचे बक्षीस जाहीर; छायाचित्र जारी




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: गोरक्षण मार्ग रहिवासी भाजप तथा विश्व हिंदू परिषदेचे नेते बिल्डर रामप्रकाश मिश्रा ramprakash mishra यांच्यावर त्यांच्याच घरासमोर अज्ञात आरोपींनी ऑगस्ट 2024 मध्ये प्राणघातक हल्ला केला होता. crime news हल्ला करणारे दोन आरोपींना याआधी अकोला पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी तीन आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे आरोपी घटनेपासून फरार असून, तिघेही नागपूर येथील रहिवासी आहे. या आरोपींना पकडण्यासाठी अकोला पोलिसांनी तीन लाखाचे बक्षीस जाहीर करून शुक्रवारी रात्री आरोपींचे नावे, पत्ता आणि छायाचित्र जारी केले आहे.




बिल्डर रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा (वय 55 वर्ष रा. माधव नगर, गौरक्षण रोड अकोला.) यांनी पोलीस स्टेशन खदान अकोला येथे रिपोर्ट दिला होता की, ते नागपुर येथून अकोला त्याचे राहते घरी  30 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास परत आल्यानंतर, ते त्यांचे कार्यालय समोर वाहनातुन उतरत असतांना, अज्ञात दोन ईसमांनी त्यांचेवर मोटार सायकलवर येवून धारदार चाकुने जिवानीशी ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला करून, त्यांना गंभीर जखमी करून आरोपी हे घटनास्थळावरून पळून गेले. अश्या फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन खदान अकोला यांनी अपराध नं 628/24 कलम 109, 3 (5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासावर घेतला होता.



या गुन्हयात आरोपी अज्ञात असल्याने पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह यांनी पोलीस निरिक्षक शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पो.नि शंकर शेळके यांनी सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव यांचे नेतृत्वात स्थानीक गुन्हे शाखेचे पथक गठीत करून पथकाला गुन्हा उघडकीस आणण्या बाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्यात. यावरून तपास पथकातील अधिकारी आणि अमंलदार यांनी घटनेचे वेळी उपलब्ध असलेले सी. सी. टी. व्ही फुटेज तसेच तांत्रिक बाबींचा व गोपनीय बातमीदार यांचा वापर करून, गुन्ह्याचा तपास करून त्यामध्ये जखमी  रामप्रकाश मिश्रा यांचेवर हल्ला करणारा पवन विठ्ठल कुंभलकर (वय 31 वर्ष रा. श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क 2 कनान जि. नागपूर) याने त्याचे साथीदार सह गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. आरोपी  पवन विठ्ठल कुंभलकर (वय 31 वर्ष रा. श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क 2 कनान जि. नागपूर) अटक करण्यात आली होती. त्याचा सोबती  मंगेश उर्फ दादा तोताराव सावरकर (रा. मिर्ची बाजार, जयभीम चौक, इतवारी नागपूर) यास नागपूर येथून क्राईम युनिट 5 नागपूर, याचे मार्फत ताब्यात घेण्यात आले. आरोपीस पुढील तपास कामी पो. स्टे खदान, अकोला यांचे ताब्यात देण्यात आले होते.


तपासा दरम्यान याप्रकरणात आणखी तीन आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले. हे तीनही आरोपी नागपूर येथील रहिवाशी असून फरार आहेत. पोलिसांनी तीन फरार आरोपींची माहिती देण्यासाठी 3 लाख रुपयांचे बक्षीस शुक्रवारी रात्री जाहीर केले आहे.


मुश्ताक सिमनानी अब्दुल खालीक हफिजजी उर्फ सबरी (वय 50 वर्ष रा मोमीनपुरा, नागपूर)


मोहम्मद शमी उर्फ शमीम अब्दुल अजिज (वय-42 वर्ष रा- बारानाल चौक, इंदिरा नगर, नागपुर)


मुस्तफा सलाम शेख (वय 37 वर्ष रा- प्रितीदार सोसायटी, प्लॉट क. 5, नारा बस स्टॉप कृष्णा नगर, जरीपटका नागपुर) असे या आरोपींचे नावे आहेत.

हे तिन आरोपी फरार झाले असून, त्यांची माहिती देणाऱ्यांसाठी अकोला पोलिस प्रशासनाने बक्षीस जाहीर केले आहे. 


अकोला पोलीस दलाचे आवाहन 


पोलीस स्टेशन खदान अकोला येथील FIR/अप क्र.628/2024 कलम 109,3(5) BNS (307) मधील  3 फरार आरोपी बाबत माहिती देणाऱ्यास 3 लाख बक्षीस देण्यात येईल तसेच माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. माहिती मिळाल्यास शंकर शेळके (पोलीस निरीक्षक) स्था. गु. शा. अकोला, मनोज केदारे (पोलीस निरीक्षक) पो स्टे-खदान, पो. हवा. अब्दुल माजिद स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.




टिप्पण्या