- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Bollywood-actor-Saif-Ali-Khan: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याचेवर वांद्रे (पश्चिम) मुंबई येथील निवासस्थानी चाकू हल्ला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
#SaifAliKhan
भारतीय अलंकार न्यूज 24
महाराष्ट्र: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याचेवर वांद्रे (पश्चिम) मुंबई येथील निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास घडली. सैफ अली खान आपल्या कुटुंबासह घरात झोपला असताना चोरट्याने घरात शिरकाव केला व त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजते.
सैफने हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये बाचाबाची झाली मात्र हल्लेखोर फरार झाला. चोरीच्या उद्देशाने हे हल्लेखोर घरात शिरल्याने समोर येत आहे. चोरट्याने त्याच्या घरात प्रवेश केल्यावर घरातील काही लोक झोपेतून जागे झाले आणि त्यांनी आवाज केला. इतक्यात सैफ अली खानही जागा होवून बाहेर आला. यानंतर सैफ आणि चोरामध्ये बाचाबाची झाली. यानंतर हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला. यावेळी त्याची दोन लहान मुले देखील होती. घरातील काही सदस्यांनी त्याला दवाखान्यात नेले.
हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सैफ यांच्या शरीरावर सहा जखमा असून त्यापैकी दोन खोल आहेत. एका जखमेचा व्रण त्यांच्या पाठीच्या कण्याजवळ आहे. तसेच मानेवर देखील जखम आहे. सध्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार असून वांद्रे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध एफआयआर दाखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच मुंबई क्राइम ब्रांचही या घटनेचा सखोल तपास करत आहे. सध्या घरातील सीसीटीव्ही फूटेज आणि इतर पुरावे गोळा करून तपास करण्यात येत आहे.
या घटनेनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सैफ अली खानच्या घरात घडलेला हा प्रकार त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. सैफ अली खानच्या चाहत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होत असून #SaifAliKhan हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा