- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
birth-certificate-scam-akola-: बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा: राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा राजकीय फायदा- किरीट सोमय्या यांचे अकोल्यात वक्तव्य
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्रातील बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते तथा सामजिक कार्यकर्ते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या अनुषंगाने किरीट सोमय्या यांनी आज नागपूर , यवतमाळ आणि अकोला येथे महसूल विभागाची बैठक घेतली आहे.
महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
अकोल्यात किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहे. या बांगलादेशी नागरिकांचा फायदा निवडणुकीत महाविकास आघाडीला झाला असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. तर बांगलादेशी नागरिकांना भारतात जन्म प्रमाणपत्र मिळवून देण्याचा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा राजकीय फायदा असल्याचंही ते म्हणाले.
अकोला अमरावती हे केंद्रस्थान
अकोल्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र दिल्या गेल्याचा आरोप करीत अकोला अमरावती हे बांगलादशीयांचे केंद्रस्थान बनत असल्याचाही किरीट सोमय्या यांनी यावेळी म्हंटले.
साजीद खान पठाण यांनी लेखी द्यावे
यावर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी सुद्धा हा गंभीर मुद्दा असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र साजिद खान पठाण यांनी तोंडी न बोलता लिखित स्वरूपात सादर कराव असे आवाहन किरीट सोमय्या यांनी केले आहे.
अकोल्याचे राजकिय वातावरण तापले
किरीट सोमय्या यांच्या या आरोपानंतर अकोल्यात आता राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे.
Akola
Bangladeshi
birth certificate scam
Kirit Somaiya
Political gain
Rahul Gandhi
Rohingya
Uddhav Thackeray
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा