birth-certificate-scam-akola: बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा: किरीट सोमय्या पोहचले अकोल्यात




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा सामजिक कार्यकर्ते किरीट सोमय्या शुक्रवारी सायंकाळी अकोला मध्ये आले यावेळी त्यांनी आमदार रणधीर सावरकर यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पोहोचून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याशी सविस्तर चर्चा केली असल्याचे समजते. 


किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी रोहिंग्या यांची भारतामध्ये घुसखोरी होत असल्याची पाहता भारतामध्ये किती बांगलादेशी अवैध रहात आहेत हे जाणून घेण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आहे.  



त्यानुसार आज नागपुर, यवतमाळ आणि अकोला जिल्हाचा दौरा किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या अकोल्यात सायंकाळी पोहचले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात किरीट सोमय्या, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची चर्चा झाली. 





दरम्यान किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार यवतमाळ जिल्हामधे 11,864, अकोला जिल्हा मधे 15,845 "उशिरा जन्म प्रमाणपत्र" साठी अर्ज आले आहेत.

टिप्पण्या