- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
amc-swati-company-contract-: स्वाती कंपनीचा करार रद्द: शिवसेना उबाठा तर्फे अधिकाऱ्यांचा सत्कार, मनपा परिसरात आतिषबाजी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
करावरील शास्ती माफीचीही केली मागणी
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महानगरपालिकेचा स्वाती इंडस्ट्रीजसोबतचा करार रद्द झाल्याचा जल्लोष शिवसेना उबाठा सेनेचे राजेश मिश्रा व शिवसैनिकांनी,कार्यकर्त्यांनी आज 1 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता महापालिका आवारात फटाके फोडून आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करून लाडू वाटप करून करावरील शास्ती माफीचीही मागणी करीत जल्लोष केला.
शिवसेना उबाठा सेनेचे राजेश मिश्रा व शिवसैनिकांनी अनेकदा आंदोलने करून स्वाती कंपनी सोबत केलेला करार हा अवैध असून आपल्या मनपा कडे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ असून फुकटचे कमिशन स्वाती कंपनीला दिले जात आहे, त्यामुळे हा करार रद्द करावा अशी मागणी अनेकदा केली गेली आहे. यासाठी शिवसेना उबाठा सेनेचे राजेश मिश्रा व शिवसैनिकांनी शहरात गल्लीबोळात फिरून स्वाती कंपनीला शहरातील लोकांनी वसुली देऊ नये असे आवाहन करताना प्रथम स्वाक्षरी अभियान चालविले. त्यानंतर पत्रके घरोघरी वाटून जनतेला आवाहन केले होते. मात्र कुण्याही अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. मात्र काल प्रशासक आणि मनपा आयुक्त डॉ लहाने यांनी वसुली समाधानकारक नसल्याचे सांगत करार पत्रात नमूद तरतुदीचे पालन केले गेले नसल्याचे कारण देत स्वाती कंपनी सोबतचा करार रद्द केला आहे. ही गोड बातमी शहरातील नागरिकांना मिळताच शिवसेना उबाठा सेनेचे राजेश मिश्रा व शिवसैनिकांनी मनपा आवारात फटाके फोडून आणि मनपा अधिकारी विजय पारतवार आणि उपायुक्त यांचा सत्कार करून जल्लोष साजरा केला.
यावेळी शहराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांना लाडू वाटप केले.
महापालिका उप आयुक्त (प्रशासन) गीता ठाकरे यांना भेटून मिश्रा यांनी मार्च 2025 पर्यंत कर वसुलीवर शास्ती माफ करण्याची योजना सुरू करण्याची मागणी केली. त्यांनी नागरिकांना टॅक्स भरण्यात दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मिश्रा यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाला नागरिक हिताचे निर्णय घेण्याचे आवाहन करत, "जनतेच्या समस्यांची सोडवणूक आणि प्रलंबित कर मुद्द्यावर उपाययोजना हीच खरी सेवा आहे," असे मत व्यक्त केले. .महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
यावेळी तरूण बगेरे, मंगेश काळे ,सुरेंद्र विसपुते, अनिल परचुरे,अंकुश शिंत्रे, प्रकाश वानखडे ,रुपेश ढोरे, अविनाश मोरे, बाळू पाटील, संजूअण्णा फुललेलू, गणेश बुंदेले, गोपाल लव्हाळे, नितीन देशमुख, शैलेश अधुरेकर,रोशन राज, देवा गावंडे, पंकज बाजोड ,विजय तिखिले, राजेश कानापुरे,मंगेश पावले ,योगेश गीते आदी उपस्थित होते.
अकोला मनपा कर वसुली संदर्भात देण्यात आलेला मे.स्वाती इंडस्ट्रीज (रांची) यांचा कंत्राट रद्द
अकोला महानगर पालिका प्रशासनाव्दारा मालमत्ता कर, बाजार परवाना वसुली, पाणी पट्टी कर वसुली दैनंदिन बाजार वसुली ईत्यादी कर वसुलीचा कंत्राट 2 ऑगस्ट 2023 रोजी पासून मे.स्वाती इंडस्ट्रीज (रांची) यांना देण्यात आले होते.
परंतू सदर कंपनी कडून करारनामाच्या शर्ती व अटीनुसार काम केले नसल्याने 31 डिसेंबर 2024 रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये सदर कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. तसेच मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.लहाने यांच्या आदेशान्वये यापुढे मनपाच्या सर्व प्रकारची करांची वसुली मनपा स्तरावर म्हणजे पुर्वीप्रमाणे करण्यात येणार आहे.
यापुढे मालमत्ता कर, बाजार/परवाना वसुली, पाणी पट्टी कर वसुली दैनंदिन बाजार वसुली ईत्यादी करांची वसुली ही मनपा कर्मचा-यांव्दारेच करण्यात येणार असून शहरातील नागरिकांनी कोणत्याही खाजगी व्यक्तिकडून करा संदर्भातील पैशांचा व्यवहार करू नये. मनपाच्या मुख्य कार्यालय आणि चारही झोन कार्यालय येथे कराचा भरणा करण्याची सुविधा करण्यात आली असून शहरातील नागरिकांनी आपला थकित व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा करून मनपा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन कर अधिक्षक तथा सहा.आयुक्त विजय पारतवार यांनी केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा