- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राज्यातील सहा जिल्हा परिषद व 44 पंचायत समितींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासक नियुक्तीचे आदेश ग्रामविकास विभागाने बुधवारी सायंकाळी काढले होते. त्यामुळे आज अकोला, वाशीम, नागपूरसह राज्यातील सहा जिल्हा परिषदांवर प्रशासक राज सुरू झाले आहे.
राज्यातील अकोला, वाशीम, नंदुरबार, धुळे जिल्हा परिषदांचा 16 जानेवारीला, नागपूर 17 जानेवारीला, तर पालघर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 17 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे. या जिल्हा परिषदांतर्गत 44 पंचायत समित्यांचा कार्यकाळदेखील 15 व 16 जानेवारी आणि 14 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे. जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, पंचायत समित्यांचे सभापती, सभापतींची पदे एकाचवेळी रिक्त होत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 4 फेब्रुवारी 2022 व 18 डिसेंबर 2024 च्या पत्रात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका विहित कालमर्यादेत घेणे शक्य नसल्याचे नमूद केले आहे. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील कलम 91 ब व 75 ब या कलमान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाद्वारे जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधित जिल्हा परिषदांचे, तर पंचायत समित्यांचे संबंधित गट विकास अधिकारी यांना संबंधित पंचायत समितीचे सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्राधिकृत केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तर पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून कामकाज सांभाळणार आहेत. यासंदर्भातला आदेश ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी बुधवारी सायंकाळी निर्गमित केला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक प्रलंबित आहेत. आगामी काळात महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक देखील होण्याची शक्यता आहे. राजकीय आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ असून तो निकाली निघताच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. या निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी देखील सुरू केल्याचे सध्या दिसून येत आहे.
दरम्यान अकोला जिल्हयातील अकोला अकोट बाळापुर पातुर बार्शी टाकळी तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांची पाच वर्षाची मुदत 15 जानेवारी रोजी संपली प्रशासक म्हणून संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या वार्षिक अंदाजपत्रकात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व बजेट सभेत मंजुरी दिली जाते परंतु जिल्हा परिषदेत प्रशासकांची नेमणूक करण्यात आली असल्याने येत्या फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुरी देतील अकोला महापालिकेत पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक राज आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत प्रशासक हे सुपर ऍथॉरिटी राहतील.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा