- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये, अकोला शहरातील सिटी कोतवाली ते गांधी चौक ते खुले नाट्यगृह ते फतेह चौक येथील वाहतुकीस अडचण निर्माण करणा-या रस्त्यावरील अतिक्रमणावर मनपा नगर रचना आणि अतिक्रमण विभागाव्दारे निष्कासनाची कारवाई आज 10 जानेवारी रोजी करण्यात आली आहे.
यामध्ये चार चाकी गाड्या, दुकाना समोरील टीनशेड आणि सहित्य ठेवून केलेले अतिक्रमणाचा समावेश होता.
या कारवाईत सहायक नगर रचनाकार राजेंद्र टापरे, सहायक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे तसेच अतिक्रमण विभागातील आणि अभिकर्ताचे कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
ऐन सणासुदीच्या काळात मनपाने केलेल्या या कारवाईमुळे व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, फेरीवाले यांच्यात नाराजी पसरली. तर सामान्य नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, अतिक्रमण परत ‘जैसे थे’ होवू नये, यासाठी मनपाचे कायम स्वरुपी यावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा