- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
*वॉक फॉर चाईल्ड वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
*तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीच्यावतीने आयोजन
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : प्रत्येक मूल हे आपलं मूल आणि प्रत्येक पाऊल बालकांसाठी हे ध्येयवाक्य घेवून गेल्या वीस वर्षापासून बालक, महिला आणि उद्योग अशा क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्य करुन समाजात आपला एक आगळावेगळा ठसा उमटविणा-या तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आज रविवार, १५ डिसेंबर रोजी बालकांचे हक्क व अधिकारांकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी वॉक फॉर चाईल्ड वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रविवारी सकाळी ७ वाजता ‘वॉक फॉर चाइल्ड‘ वॉकेथॉनला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवी झेंडी दाखविली. बालकांचे हक्क व अधिकारांसाठी आयोजित या वॉकेथॉनचा प्रारंभ श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय येथून करण्यात आला. त्यानंतर सिव्हील लाईन चौक, पोस्ट ऑफिस चौक, अशोक वाटिका चौक, नेहरुपार्क चौकमार्गे पुन्हा श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे परत येवून तेथे या वॉकेथॉनचा समारोप करण्यात आला. बालकांवर होणारे अन्याय व अत्याचार याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच समाजात या संदर्भात जनजागृती करण्यासाठी तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या वतीने अशाप्रकारे मागील ४ वर्षापासून या वॉकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. सोबतच या वेळेला बालकांचे कायदे व अधिकार याबाबत प्रदर्शनी लावण्यात आली होती. ही प्रदर्शनी पाहण्यासाठी नागरिकांनी गदीa केली होती. ‘वॉक फॉर चाइल्ड‘ वॉकेथॉन या उपक्रमात समाजातील सर्व स्तरातील घटकांनी सहभागी घेतला. वॉकेथॉनमध्ये बहुसंख्येने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, एनसीसी कॅडेट, तसेच विविध क्रिकेट संघ सहभागी झाले होते. दामिनी पथकाचे पोलीस मोटरबाईक घेवुन यावेळी उपस्थित होते. या वॉकेथॉनला पोलीस विभागाचे विशेष सहकार्य लाभले. त्यासाठी तिक्ष्णगत संस्थेच्यावतीने पोलीस विभागाचे आभार व्यक्त करण्यात आले.
बालकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी लोकजागृती कमी पडत आहे - डॉ. वाघमारे
बालकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले असून, देशातील प्रत्येक नागरिकाने बालकांप्रति संवेदनशील होण्याची गरज आहे तसेच प्रत्येक बालक आपलं बाळ आहे या दृष्टीकोनातून बालकांकडे पाहणे तसेच त्याचे प्रत्येक पाऊल आपल्या बाळाचे पाऊल आहे. असे प्रत्येक पालकांनी समजणे गरजेचे आहे. परंतु बालकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी लोकजागृती कमी पडत आहे. ती लोकजागृती व्हावी यासाठी झटणारी देशातील एकमेव संस्था म्हणजे तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुगत वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केले.
बालक सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक समाजाची जबाबदारी - अजित कुंभार
देशातील बालकांच्या हक्काच्या व त्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी देशातील शासकीय यंत्रणा व अधिकारी कायदेशीर मार्गाने आपले कर्तव्य पार पाडीत असतात. तसेच याचसाठी देशातील विविध सामाजिक संस्था लोकजागृती करीत आहेत. विविध समाजातील बालकांच्या हक्काचे संरक्षण हा देशातील महत्वाचा मुद्दा आहे. २१व्या शतकातील भारत उज्वल करण्यासाठी लोकजागृती आवश्यक आ, असे मत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी वॉक फॉर चाईल्ड वॉकेथॉनला हिरवी झेंडी दाखवितांना व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ. तनुजा सुगत वाघमारे, सचिव विष्णुदास मोंडोकार, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड. संजय सेंगर, अॅड. अनिता गुरव, श्रीकांत पिंजरकर, विशाल शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूळकर, अॅड. फाटे, पंकज साबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि.प.अकोला सौ. कौलखेडे, चाईल्ड लाईनचे पदाधिकारी व सदस्य, तिक्ष्णगत संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, वन स्टॉप सेंटर, कैलास सत्यार्थी संस्था, संतोष पोवराज, प्रदीप अवचार, गोपाल मुकुंदे, माजी सैनिक संघटनेचे चव्हाण, पातोंड यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा